महिना सप्टेंबर, दिवस 62 वा, सामान्य ज्ञान, इयत्ता सहावी ते आठवी
1) 11.07 हा अपूर्णांक संख्यारेषेवर दाखविण्यासाठी एकक अंतराचे किती भाग करावे लागतील?
:- 100
2) पेशींच्या संख्येवरून प्राण्यांचे दोन प्रकार कोणते?
:- एकपेशीय ,बहुपेशीय
3) वेदकाळातील प्रमुख वाद्ये कोणती ?
:- वीणा, शततंतू, झांजा, शंख
4) दिवसभराच्या कमाल व किमान तापमानांतील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन...... म्हणतात.
:- तापमान कक्षा
5) कोणत्या किटभक्षी वनस्पतीची रचना एखाद्या फुलासारखी असते?
:- ड्रॉसेरा बर्मानी
6) शिवरायांच्या राजमुद्रेवर कोरलेल्या ओळी कोणत्या भाषेत आहेत?
:- संस्कृत
No comments:
Post a Comment