[*उपक्रम - सावलीवरुन कालमापन*
*विषय - भूगोल*
*घटक - स्थानिकवेळ व प्रमाणवेळ*
पूर्वीच्या काळात व आताच्या काळात वापरण्यात येणाऱ्या कालमापनाच्या साहित्याबाबत चर्चा घेऊन सूर्याच्या सावलीवरुन स्थानिक वेळेचा अनुमान कसा लावावा हे प्रत्यक्ष कृतीद्वारे स्पष्ट केले.
यासाठी दि २० जून रोजी मुलांना पटांगणात नेऊन एक सळई मातीत उभी केली. दुपारी बारा वाजता त्या सळईच्या सावलीचे निरीक्षण करुन तिच्या सावलीवर खूण केली.
दुपारी तीन वाजता व साडे चार वाजता देखील सावलीचे निरीक्षण केले.सावलीची नोंद घेतली.
दि.२१ जूनला जागतिक योगादिनानिमीत्त सकाळची शाळा होती. त्यामुळे सकाळी ८ वाजता व दहा वाजता देखील सावलीची नोंद घेतली.
सकाळ , दुपार , संध्याकाळ च्या सावलींची तुलना घेऊन फरक विचारला.
मुलांनी सकाळी सावली पश्चिमेस वस्तूपेक्षा मोठी दिसते.दुपारी सावली लहान तर संध्याकाळी पूर्वेकडे सावली मोठी दिसते.असे निरीक्षणांती सांगितले .
सावली सूर्याच्या विरुद्ध दिशेस पडते.
सावलीची उंची व तिची दिशा यावरुन कालमापन करता येते. प्रत्यक्ष अनुभवाद्वारे मुलांनी जाणले.
सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता. भिवंडी , जि.ठाणे.
[6/27, 3:51 PM] Jyoti Belawale: 📖📖📖📖📖📖📖📖📖
*अतिशय कमी कालावधीमध्ये मुलांना मराठी वाचन शिकवण्यासाठी एक उपयुक्त उपक्रम.*
*मुले हसत खेळत आणि आनंदाने शब्द वाचन करू शकतात.*
*या वर्षी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांनी दहा दिवसांमध्ये शब्दवाचनास सुरुवात केलेली आहे.*
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
*उपक्रमाची कार्यवाही :—*
1⃣ *सर्वप्रथम एका कागदाचे किंवा ड्राईंग शीटचे विद्यार्थीसंख्येनुसार तुकडे करावेत किंवा तेवढे कागद घ्यावेत.*
2⃣ *एका विद्यार्थ्याला आपल्याजवळ बोलवावे व त्याला आपल्या उजव्या हाताकडे उभे करावे .*
3⃣ *विद्यार्थ्याला त्याचे नाव विचारावे व ते कागदावर त्याच्यासमोरच लिहावे आणि त्याला तो लिहिलेला शब्द त्याचे नाव आहे असे सांगावे व त्याला लगेच तो शब्द वाचायला लावावा .*
4⃣ *नंतर त्याला खायला कोणता पदार्थ आवडतो ते विचारावे व तो शब्द नावाचा खाली लिहावा. हा लिहिलेला शब्द त्याचा आवडता पदार्थ आहे हे त्याला सांगावे व तो शब्द वाचायला लावावा .*
5⃣ *विद्यार्थ्याला त्याच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव विचारावे व ते नाव लिहावे व हे तुझ्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव आहे हे त्याला सांगावे .*
6⃣ *शेवटी विद्यार्थ्याला त्यांचा आवडता खेळ विचारावा व त्या खेळाचे नाव लिहावे हे तुझ्या आवडत्या खेळाचे नाव आहे हे त्याला सांगून तो शब्द वाचायला लावावा .*
7⃣ *अशा पद्धतीने दोन तीन वेळा वाचण्याचा सराव केल्यानंतर विद्यार्थी ते शब्द न घाबरता व न अडखळता वाचायला सुरुवात करतो .*
8⃣ *या शब्द पट्ट्यांचा शब्द वाचनाचा किमान दोन दिवस सराव घ्यावा .*
9⃣ *नंतर या शब्दांचा क्रम बदलून शब्द वाचनाचा सराव घ्यावा .*
🔟 *अशाप्रकारे सर्व मुलांच्या शब्दपट्या तयार कराव्यात.*
1⃣1⃣ *सहा सात दिवसांत मुले क्रम बदलला तरी शब्द वाचायला लागतात .*
1⃣2⃣ *मुले आपली शब्द पट्टी तसेच वर्गातील इतर मुलांची शब्द पट्टी ओळखू लागतात .*
1⃣3⃣ *हळूहळू इतर मुलांच्या शब्द पट्टीवर लिहिलेले शब्द सर्व विद्यार्थी वाचू लागतात .*
1⃣4⃣ *नंतर कोणत्याही शब्द पट्टीवरील शब्द फळ्यावर लिहावा व हा शब्द कोणाचा शब्द पट्टीवरील आहे असे विचारावे .*
1⃣5⃣ *ज्याच्या शब्द पट्टीवरील तो शब्द असेल तो विद्यार्थी लगेच प्रतिसाद देतो. काही दिवसांनंतर मुले इतरांच्या शब्द पट्टीवरील शब्दसुद्धा ओळखू लागतात. थोड्या कालावधीनंतर त्या शब्दाची फोड करून त्यातील एक एक अक्षराचा ध्वनी त्यांना ऐककावा .*
1⃣6⃣ *वेगवेगळ्या शब्दातील अक्षरे वापरुन शब्द तयार करावेत. ते शब्द मुले सहज वाचतात.*
*टीप :— यातील प्रश्न किंंवा त्यांचा क्रम आपल्या पसंतीनुसार निवडावा. प्रश्न विद्यार्थी भावविश्वातील असावेत.*
*या उपक्रमाचे फायदे : —*
*1. मुले आनंदाने सहभागी होतात.*
*2. सर्वांना सहभागाची संधी मिळते.*
*3. स्वतःच्या आवडीचे शब्द लिहिल्यामुळे मुलांना ते आपले वाटतात .*
*हा उपक्रम राबवून केवळ दहा दिवसांमध्ये वाचन करणारी ता पहिलीतील ही काही मुले*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
🕣🕝🕛🕓🕚🕟🕧🕒
🕣🕝🕛🕓🕚🕟🕧🕒
*विषय - भूगोल*
*घटक - प्रमाणवेळ*
*खेळाचे नाव - सांगा सांगा वेळ सांगा*
साहित्य - जगाचा नकाशा , पुठ्ठा , 24 ताशी वेळेची पट्टी इ.
कृती - जगाच्या नकाशा कार्डपेपरवर चिटकवला. त्याचा दंडगोल तयार केला.नकाशावर १५ अंशाच्या फरकाने दिलेले रेखावृत्तांचे निरीक्षण करण्यास सांगून, नकाशावर १५ अंश अंतराने रेखावृत्त का दिले आहे यावर चर्चा केली. कारण वेळेच्या बाबतीत एका रेखावृत्तावर ४ मिनिटांचा फरक पडतो म्हणजे १५ अंशावर ६० मिनिटे म्हणजेच एका तासाचा फरक पडतो. ० ते २४ या तासपट्टीचा देखील दंडगोल तयार केला. जगाच्या नकाशाच्या दंडगोलात तासपट्टीचा दंडगोल घातला.
आता तासपट्टी फिरवून नकाशावरील कोणत्याही रेखावृत्तावर कोणत्याही वेळेची खूण बसवल्यावर इतर रेखावृत्तांवर कोणत्या वेळा आहेत हे लगेचच समझते. या सरकत्या पट्टीचा व दंडगोलावरील नकाशाचा उपयोग करुन प्रमाणवेळ खेळ घेतला.मुले पट्टी फिरवून , निरीक्षण करुन वेळ सांगत होती. हा खेळ विद्यार्थांचे दोन गट तयार करुन घेतला.
खेळाच्या माध्यमातून प्रमाणवेळ हा घटक नकळतपणे स्पष्ट झाला.
सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे.
ता. भिवंडी , जि. ठाणे.
🕒🕧🕟🕚🕓🕛🕝🕣b
[7/3, 7:27 PM] Jyoti Belawale: 🌏🌍🌎🌏🌍🌎🌏🌍🌎
विषय - भूगोल/ कार्यानुभव
घटक - पृथ्वीचे अंतरंग
इयत्ता - सहावी/ सातवी/ आठवी
*चला बनवूया पृथ्वीच्या अंतरंगाची प्रतिकृती*
🌎🌍🌏🌎🌍🌏🌎🌍🌏
साहित्य - गव्हाचे पीठ, रंग (लाल, भगवा,निळा), मार्कर, पाणी , लाटणे, कटर इ.
कृती - गव्हाचे पीठ घट्ट मळून त्याचे तीन भाग केले. त्यातील एका भागात लाल रंग, दुसऱ्या भागात भगवा रंग व तिसऱ्या भागात निळा रंग टाकून तीन वेगवेगळे गोळे तयार केले.
भगव्या रंगाची चपाती लाटून लाल रंगाच्या गोळ्यावर व्यवस्थित दाबून बसवली.नंतर निळ्या रंगाची चपाती लाटून ती तयार गोळ्यावर ( लाल + भगवा रगाचा गोळा ) बसवली.खराट्याच्या काडीने जगाच्या नकाशाचे रेखाटन करुन मार्करने ते रेखाटन रंगवले.
ही तयार झाली पृथ्वीची प्रतिकृती .कटरने या पृथ्वीचे दोन भाग केले. निळा, भगवा व लाल रंगाचे पृथ्वीचे अंतरंग दिसते.
निळा भाग म्हणजे भूकवच , भगवा रंग म्हणजे प्रावरण आणि लाल भाग म्हणजे गाभा. या भागांची अधिक माहिती देऊन you tube वरील काही video दाखवले.
कार्यानुभवाच्या तासिकेत माझ्या मुलांनी ही प्रतिकृती तयार केली. प्रत्यक्ष कृती केल्याने परिणामकारकता वाढली.
सौ.ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी , जि.ठाणे.
🌎🌍🌏🌏🌍🌎🌏🌍🌎
*उपक्रम - कृतियुक्त विज्ञान*
*उपक्रम - कृतियुक्त विज्ञान*
इयत्ता - आठवी
*विषय - सा. विज्ञान*
*घटक - बल व दाब*
*उपघटक - संपर्क व असंपर्क बले*
*संतुलित व असंतुलित बले*
*साहित्य - चुंबक , टाचण्या , साडी, पुठ्ठा , दोरा, धान्याची कोठी, कंगवा, कागद इ.*
कंगव्याला कागदाचे कपटे चिटकवून व चुंबकाकडे टाचण्या आकर्षित होतात या क्रियांद्वारे असंपर्क बले स्पष्ट केली.
ढकलणे, ओढणे, साडीखेच इ. क्रियांद्वारे संपर्क बले स्पष्ट केली.
संतुलित व असंतुलित बले स्पष्ट करण्यासाठी पुठ्ठ्याला दोरी बांधून तराजू तयार केला.दोन्ही पारड्यात समान वस्तुमानाची वस्तू ठेवली असता दोन्ही पारड्यावर समान गुरुत्वीय बल कार्य करते.ती विरुद्ध दिशेने लावल्यामुळेत्यांचे परिणामी बल शुन्य होते.अशा प्रकारे संतुलित बल स्पष्ट केले.
याउलट एका पारड्यात जास्त वस्तुमानाची वस्तू ठेवल्यास खोके अधिक वस्तुमानाच्या पारड्याच्या दिशेने सरकू लागते. खोक्याला दोन्ही बाजूला असमान बले लावल्याने असंतुलित बल कार्यरत होऊन खोक्याला गती मिळते.
रस्सी नसल्यामुळे साडीला पीळ देऊन साडीची रस्सीखेच या खेळातून दोन्ही बाजूला सारखे बल असेल तर दोर हलत नाही . म्हणजेच हे संतुलित बल होय.
एका बाजूचे बल अधिक झाले तर दोर त्या बाजूला सरकतो.हे असंतुलित बलाचे उदाहरण होय.
धान्याने भरलेला डबा दोन मुलांकडून दोन बाजूंनी उचलणे म्हणजे संतुलित बल आणि एकाच मुलाने उचलणे म्हणजे असंतुलित बल होय.
अशा विविध कृतींच्या साह्याने संतुलित व असंतुलित बले ही संकल्पना स्पष्ट केली.
*सौ.ज्योती दिपक बेलवले*
*जि.प.शाळा केवणीदिवे*
*ता- भिवंडी , जि.-ठाणे.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
*शिकूया अन करूया आवणी* ( भाताची लावणी )
आज पाऊस कमी असल्याने केवणीदिवे येथील रत्ना चंद्रकांत पाटील यांच्या भात शेतीला इ.८ वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.भाताचे रोप खणून मुठ तयार केली. त्याचे प्रात्यक्षिक पेण दादर येथील आवणीसाठी आलेले सुमन दत्ता पाटील ,तुळसाबई रामा जोशी, हिरुबाई पाटील यांनी केले. मुलांनी मुठ खणले, मुठ बांधले.
बांधलेली मुठ शेतातल्या पाण्यात धुतली. आवणी कशी करावी हे मुलांसोबत मी व माझी सखी स्नेहा पाटील यांना पेण दादरच्या
सुमन ताई, तुळसाबाई ताई, हिरुबाई ताई यांनी प्रात्यक्षिकासह शिकवले.
मग काय.... आवणी एक्सप्रेस सुरू...
आम्ही सर्व जणांनी मिळून आवणी केली. काही मुलांनी केलेली आवणीतील रोपे काही वेळाने वर तरंगत होती. त्यांना पुंन्हा मार्गदर्शन करून नीट आवायला शिकवले. आता मुलेच मुलांचे आवणीगुरू झाले होते.ते एकमेकांना सूचना देत होते.
मुलांसोबत आम्ही दोघीनी देखील आवणीचा अनुभव घेतला. शेतकऱ्यांविषयी प्रेम व आदर निर्माण होऊन श्रमप्रतिष्ठा मूल्याची रुजवणूक झाली.
सौ. ज्योती दीपक बेलवले
जि. प. शाळा केवणीदिवे
ता- भिवंडी, जि- ठाणे
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
*इयत्ता - आठवी*
*विषय - नागरिक शास्त्र*
*घटक - संसदिय शासनपद्धती व अध्यक्षीय शासनपद्धती*
गेल्या आठवड्यात शासनपद्धती ह्या पाठावर आधारित उपक्रम घेतला.उपक्रमाची प्रेरणा नारायण मंगलाराम सरांच्या वर्ग मंत्रिमंडळ निवडणूक या उपक्रमाने मिळाली.त्यांच्या उपक्रमात बदल करुन मी आठवीच्या ना.शा. तील पाठावर आधारित उपक्रम घेतला.
दि.१७/७/२०१८ ला उमेदवारी अर्ज भरुन घेतले. १८/७/२०१८ प्रचार व १९/७/२०१८ ला निवडणूक ...असे कार्यक्रमाचे नियोजन केले.
*संसदिय शासनपद्धती*
यासाठी वर्गातील *अभ्यासगट म्हणजे राज्ये* व *वर्ग म्हणजे देश* असे मानून कार्यवाहीस सुरुवात केली.निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले.उमेदवारांनी अर्ज भरुन चिन्हे निवडली.चिन्ह निवडताना त्यांच्या आवडीचे चिन्ह निवडण्याची संधी दिली.पेन्सिल , मोबाईल,कपबशी, पाटी, tv , पुस्तक, चाॕकलेट इ. चिन्हे मुलांनी निवडले. उमेदवारी अर्ज भरुन घेतले.उमेदवारी अर्ज मुलांनी स्वहस्ताक्षरात भरले. प्रचारासाठी एक दिवस दिला. ( केवणीदिवेचा रस्ता चांगला केला तर तुला मत देईन...वर्गासाठी tv दिला तर तुला मत देईन...माझ्या मैत्रीणीला मत दिले तर मी तुला मत देईन..इ.)प्रकारची चर्चा मुले सुट्टीत करुन प्रचार करत होती.
मतदानाच्या दिवशी सर्व राज्यांचे गुप्तमतदान घेतले.
मतदान अधिकारी १ म्हणून रिया पाटीलने काम पाहिले.मतदाराची ओळख पटवण्याचे काम तिने केले.
मतदान अधिकारी २ म्हणून विजयने काम पाहिले.त्याने शाई लावण्याचे काम केले.
मतदान अधिकारी ३ म्हणून परिग्ना भोईरने काम केले. मतपत्रीका घडी घालून देण्याचे काम तिने केले.
पूर्ण मतदान झाल्यावर मतपेटी फोडून मतमोजणी केली. प्रत्येक राज्यातून निवडून आलेल्या विजयी उमेदवारांचे शाल, चाॕकलेटच्या कागदांचा हार घालून अभिनंदन केले.
देशातील म्हणजेच वर्गातील निवडून आलेल्या उमेदवारांना सत्तास्थापनेसाठी गट तयार करण्यास सांगितले .बहूमत ज्या गटाकडे असेल त्यांचा *पंतप्रधान व इतर मंत्री* असतील अशी कल्पना दिली .
बराचवेळ चर्चा करुन झाल्यावर निवडून आलेले उमेदवारांचे मतदान घेतले.मतमोजणी केली. *सिद्धांत भोईर पंतप्रधान ( वर्गमंत्री ), वैष्णवी शिक्षणमंत्री, भुमिका सजावटमंत्री, भौमिक आरोग्यमंत्री, पूर्वा शिस्तमंत्री, धम्मज्योती परिपाठमंत्री, रोशन चावीमंत्री, रुची क्रिडामंत्री* या प्रकारे खातेवाटप करण्यात आले.
अभिरुप संसदिय शासनपद्धतीद्वारे हा घटक स्पष्ट करुन सांगितला.
*अध्यक्षीय शासनपद्धती*
*वर्ग म्हणजे देश* असे मानून *राष्टाध्यक्ष* पदासाठी निवडणूक घेतली. राष्ट्राध्यक्ष पदासाठी तीन जणांनी अर्ज भरले.त्यांचे चिन्हे देऊन प्रचारास वेळ दिला. निवडणूकीच्या दिवशी सर्वांनी मतदान केले. मतपेटी फोडून मतमोजणी केली. *आशिष राजभर* यास सर्वाधिक मते मिळून तो राष्ट्राध्यक्ष ( वर्गमंत्री ) म्हणून निवडून आला.त्याचे देखील शाल , चाँकलेटच्या फुलांचा हार घालून अभिनंदन केले. सर्वांच्या जबाबदाऱ्या पटवून देऊन शपतविधी घेतला.
संसदिय शासनपद्धती व अध्यक्षीय शासनपद्धती यांतील फरक मुलांनीच सांगितला. अशाप्रकारे *अभिरुप शासनपद्धती* घेऊन घटक स्पष्ट केला.
*सौ.ज्योती दिपक बेलवले* *जि.प.शाळा केवणीदिवे*
*ता- भिवंडी , जि- ठाणे*
[7/25, 9:17 PM] Jyoti Belawale: *इयत्ता - आठवी*
*विषय - सा. विज्ञान*
*घटक - बल व दाब*
*उपघटक - जडत्व, स्थायू वरील दाब,द्रवावरील दाब*
*साहित्य - चंचूपात्र ,नाणे, पुठ्ठे, फळी, पुस्तके, प्लॅस्टिकची बाटली, खिळा, पाणी इ.*
*जडत्व*
ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी चंचूपत्र पाण्याने भरले. त्यावर पुठ्ठा ठेवला. पुठ्ठायावर नाणे ठेवून ठीचकी मारली. विद्यार्थ्यांनी निरीक्षण करून निष्कर्ष काढला.
वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व म्हणतात...अनेक उदाहरणे देऊन चर्चेद्वारे जडत्व स्पष्ट केले.
*स्थायूवरील दाब*
स्थायूवरील दाब हा वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो हे स्पष्ट करण्यासाठी पातळ फळी घेऊन त्यावर दोन पुस्तके वेगवेगळी ठेवली. फळी पुस्तकाच्या दाबाने थोडी वाकली . नंतर तीच पुस्तके एकावर एक ठेवली . निरीक्षण केले असता फळी जास्त वाकलेली दिसली . यावरून मुलांनी निष्कर्ष काढला की
स्थायूवरील दाब हा वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो .
*द्रवाचा दाब*
एक प्लॅस्टिकची बाटली घेतली. खिळ्याने त्यावर एका सरळ रेषेत 5 सेमी वर तीन छिद्र पडले. बाटलीत पाणी भरले. मुलांना निरीक्षण करायला सांगितले. वरच्या छिद्रातील पाण्याची धार बाटलीजवळ पडते तर खालच्या छिद्रातील धार सर्वात दूर पडते. यावरुन मुलांनी निष्कर्ष काढला की द्रवाच्या खोलीप्रमाणे दाब वाढत जातो.
प्रत्यक्ष कृतीतून मिळालेल्या ज्ञानाने मुले आनंदी आणी समाधानी दिसत होते.
*सौ.ज्योती दिपक बेलवले*
*जि.प.शाळा केवणीदिवे*
*ता- भिवंडी
🌨⛈🌨⛈🌨⛈🌨⛈🌨⛈
विषय - भूगोल + गणित
*चला पर्जन्यमापन करुया*
दि.१६ जुलै ते २२ जुलै २०१८ या आठवड्यात मोजपात्राद्वारे पर्जन्य मापन कसे करतात हे स्पष्ट करुन शाळेच्या टेरेसवर सकाळी ११ वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ पर्यत झालेले पर्जन्यमान मोजपात्राचे निरीक्षण करुन विद्यार्थांनी नोंदवले. शनिवारी मात्र अमोल मौळे या विद्यार्थांच्या घरातील टेरेसवर मोजपात्र ठेवून रविवारी सकाळी ११ वाजता पर्जन्यमापन केले.
आठवड्यातील पर्जन्याची नोंद ठेवली.त्यावर अनेक प्रश्न विद्यार्थांना विचारले.आठवड्यात झालेले पर्जन्यमानाचा मुलांनी आलेख काढला. हा आलेख प्रत्यक्ष नोंदीवर आधारित तसेच स्वतःच्या शाळेतील असल्याने परिणामकारकता जास्त होती.
आठवड्यात झालेल्या पर्जन्यमानावरुन आठवड्याचे सरासरी पर्जन्य कसे काढावे हे चर्चेद्वारे स्पष्ट केले. यानुसार मासिक व वार्षिक सरासरी काढली जाते हे स्पष्ट केले.
अकरा वाजले की मुलेच मला आठवण करुन द्यायची "मॕडम, मोजपात्रातील पर्जन्याचे निरीक्षण करायचे ना.."
भौगोलिक व गणितीय संज्ञा हसतखेळत सहजपणे स्पष्ट झाल्या.
सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे.
ता - भिवंडी , जि - ठाणे.
🌨⛈🌨⛈🌨⛈🌨⛈🌨⛈
*Activity - Family of speech*
Std - seventh & eighth
*Complete the following sentences by using the proper form of any word in the given category.*
*OPEN ENDED*(मुक्तोत्तरी)
I am.............. *(Adjective)*
I am......... *( Verb)*
I like......... *(Plural noun)*
I like......... *(Pronoun)*
I saw........... *(article + noun)*
He will sing............ *(adverb)*
Can ...........cut the carrots? *(Proper noun)*
Who.............. the mangoes? *(Verb--past tense)*
She is............teacher. *(article)*
It was......... *(Verb)*
There are ...... *(countable noun)*
.......is crying . *(common noun)*
etc,....
Jyoti Deepak Belawale.
Z.P.School Kevnidive.
Tal- Bhiwandi, Dist-Thane.
*उपक्रम - स्वनिर्मित मोकळिका*
*विषय - गणित*
*घटक - परिमेय संख्या*
*उपघटक - संख्यारेषेवर परिमेय संख्या दाखवणे.*
https://youtu.be/DX_o92zLhzIhttps://youtu.be/DX_o92zLhzI
कार्यवाही - संख्यारेषेवर परिमेय संख्या दाखवणे हा भाग वर्गात स्पष्ट केल्यावर त्यात अधिक रंजकता कशी आणता येईल असा विचार करताना हा गणिती खेळ सुचला.
मुलांना शाळेच्या टेरेसवर नेऊन त्यांनाच एक मोठी संख्यारेषा खडूच्या साह्याने काढायला सांगितली . प्रत्येक विद्यार्थ्याला बोलावून त्यांच्या आवडीची एक परिमेय संख्या विचारली व त्याचे लेखन करण्यास सांगून उड्या मारून *संख्यारेषेवर परिमेय संख्या दाखवणे* ही मोकळिका घेतली.खेळाचा आनंद घेत मुले परिमेय संख्या अभ्यासत होती. विशेष म्हणजे मधल्या सुट्टीत मी न सांगता पॕसेजमध्ये मुले हा खेळ खेळताना पाहून खूप आनंद आणि समाधान वाटले.
सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे.
ता. भिवंडी , जि.ठाणे.
*शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण* कार्यक्रमांतर्गत मंगळवार दिनांक २७ मार्च २०१८ रोजी *वऱ्हाळा माता मंगलभवन कामतघर* येथे सकाळी ९:०० दुपारी ३.०० या वेळेत आयोजित करण्यात आले .
सदर कार्यक्रमासाठी *भिवंडी पं.स.सभापती मा.सौ.रविना जाधव, उपसभापती मा सौ.वृषाली विशे, पंचायत समिती सदस्य, गटशिक्षणाधिकारी मा.श्री.महेश पाटील , सर्व विस्तारअधिकारी, सर्व केंद्रप्रमुख ,शिक्षक ,पालक आदी.मान्यवर उपस्थित होते.* कार्यक्रमाची उपस्थिती लक्षणीय होती.या कार्यक्रमाचे *सुत्रसंचलन श्री. रविंद्र तरे* यांनी ओघवत्या शैलीत केले.
या कार्यक्रमात तालुक्यातील विविध यशस्वी उपक्रमांचे प्रदर्शनही लावण्यात आले.
सदर कार्यक्रमात *तालुक्यातील नाविन्यपुर्ण निवडक शाळांनी उपक्रमांचे स्टाॅल लावले.*
१) प्रगत शाळा - जि.प शाळा वैजोळा
२)कृतीयुक्त विज्ञान - जि.प.शाळा चिराडपाडा
३) योगाभ्यास - जि.प.शाळा भादाणे
४) ई-लायब्ररी - जि.प.शाळा अंजुरफाटा
५)हसत खेळत शिक्षण- जि.प. केवणी दिवे
६)खेळातुन शिक्षण भाषा / गणित - जि.प. शाळा लामज
७) कथा लेखन - जि.प.शाळा सरवली
८)खेळातून गणित - जि.प.शाळा वळपाडा/ ठाकराचापाडा
९) १००टक्के वाचन भाषा विकास - जि.प.शाळा कोशिंबी
१०) हसत खेळत शिकूया गणित /इंग्रजी- जि.प. शाळा अनगाव
११)स्पोकन इंग्लिश- गटसाधन केंद्र
१२) हस्तकौशल्यातून विद्यार्थी विकास -जि.प.शाळा ओवळी/ कारीवली
*संपूर्ण कार्यक्रमासाठी DIECPD आणि भिवंडी पंचायत समिती टीमने मेहनत घेऊन उत्कृष्ट प्रशिक्षण आयोजित केले.सौ.अर्चना अलंकार वारघडे यांनी नियोजनाकडे विशेष लक्ष दिले.*
*हसत खेळत शिक्षण* या जि.प.शाळा केवणीदिवे, केंद्र.काल्हेर, ता.भिवंडी, जि.ठाणे स्टाॕलमध्ये
*सहभागी शिक्षक ..*
*सौ.ज्योती दिपक बेलवले .*
*सौ.निशा सुरेश साळूंके.*
*श्री.चिंतामण लहू वाळकोळी.*
*सहभागी विद्यार्थी*
*सिद्धांत देवानंद भोईर.*
*रिया रामराज पाटील.*
*दर्पण विनोद मढवी.*
*निकिता घावट.*
*धम्मज्योती उत्तम गायकवाड.*
यांनी सादरीकरण केले.सादरीकरण एवढे उत्तम होते की बर्याच जणांनी ही इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आहेत का? अशी विचारणा केली. सभापती,उपसभापती यांनी स्टाॕलवर येऊन माझा सत्कार केला. शै.साहित्यातील विविधता वाखाणण्याजोगी होती.करत असलेल्या कामाची पावती मिळाल्याचे समाधान लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी *स्टाॕलधारकांना आणि सहभागी विद्यार्थांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरवण्यात आले.तसेच व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचा देखील सत्कार करण्यात आला.* सकाळपासून कार्यक्रम संपेपर्यंत वेगळा उत्साह, उमेद, चैतन्य आणि प्रेरणा निर्माण करणारा कार्यक्रम होता. सर्व अधिकारी वर्ग आणि DIECPD यांचे योगदान मनाला सुखावणारे होते.
उत्कृष्ट नियोजनाद्वारे यशस्वी झालेले हे आगळेवेगळे प्रशिक्षण .
सदर प्रशिक्षणाद्वारे सकारात्मक विचार पेरण्याचे कार्य झाले.
*शब्दांकन*
*सौ.ज्योती दिपक बेलवले.*
*जि.प.शाळा केवणीदिवे .*
*ता- भिवंडी , जि.- ठाणे.*

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
माझ्या इ. ७ वी च्या मुलांनी आणि मी तयार केलेली काही शब्दकोडी ..
यांत word picture related ...noun, plural वर आधारित word-picture puzzle आहेत.
तसेच
वनस्पतींचे अवयव,संत, ऐतिहासिक साधने, क्रियाविशेषण इ. घटकांवर तयार केलेली शब्दकोडींचा समावेश आहे.
Tit for tat या word picture story देखील मुलांनी तयार केली.
सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे.
ता- भिवंडी , जि- ठाणे.
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*Today's Linguistic Game*
I told students to write the word on black board that take away the first letter of the word and make meaningful new word.Students write so many words on black board.At last I told them that time is over 😊
example
*want - ant*
...some of these.
Jyoti Deepak Belawale
Z.P. School Kevnidive
Tal- Bhiwandi ,Dist- Thane.
🔡🔡🔡🔡🔡🔡🔡🔡🔡
*शाळा भेट*
आज दि.१६ मार्च २०१८ रोजी spoken English ची परिणामकारकता पाहण्यासाठी *इंग्रजी moderator RAA औरंगाबाद येथील श्री.मा.प्रमोद गंगावणे यांनी जि.प.शाळा केवणीदिवे शाळेस भेट दिली.त्यांच्यासोबत DIECPD ठाणे येथील इंग्रजी विषय सहाय्यक नंदिनी बडगुजर मॕडम आणि गौरी सावंत मॕडम तसेच इंग्रजी विषय साधनव्यक्ती विनायक पाटील सर* होते.
सकाळी पावणे नऊ ते अकरा वाजेपर्यंत विविधांगानी इंग्रजी भाषेविषयीची तयारी पाहिली.एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुले देखील एवढ्या आत्मविश्वासाने इंग्रजी बोलणार नाहीत एवढे उत्कृष्ट विद्यार्थी इंग्रजी बोलतात असे वर्गातील मुलांचे कौतुक केले.
इ ७ वी च्या वर्गात त्यांनी *सौ.ज्योती दिपक बेलवले* यांच्या पाठाचे निरीक्षण केले.पाठ noun and adjective या विषयावर घेतला.इंग्रजी grammar वरील पाठ कृतीयुक्त सहभाग घेऊनअगदी हसतखेळत घेतला याबद्दल त्यांनी कौतुक केले. Grammar हा तसा कंटाळवाणा घटक परंतु तुम्ही खूपच छान हा पाठ घेतला असे बोलून त्यांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेले drama, song, poem, activity , conversation , puppet show इ. सर्वच उत्कृष्ट आहे असे सांगून विद्यार्थ्यांचे कागदी फुले देऊन कौतुक केले. Drama सुरु असतानाच *मयांक आणि राज* या विद्यार्थ्यांनी drama शी संबंधित चित्राचे रेखाटन फळ्यावर केले. निरोप घेताना विनायक पाटील सरांनी जर सरांना काही विचारायचे असेल तर विचारा असे सांगितल्यावर मुलांनी विविध प्रश्न विचारुन त्यांची मुलाखतच घेतली.
वर्गातील सर्व मुले संभाषणात सहभागी होतात हे विशेष कौतुकास्पद असे ते म्हणाले.शेवटी मला काही प्रश्न विचारुन audio record मुलाखत घेतली. *सिद्धांत भोईर* या विद्यार्थ्यांने इंग्रजी विषय व वर्गातील वातावरण याबाबत इंग्रजीत मत व्यक्त केले.
सर्व कृतींचे रेकाॕर्डिग केले. *Excellent* असा शेरा देऊन I am feeling proud अशी लेखी प्रतिक्रिया व्यक्त केली.शाळेचे मुख्याध्यापक *श्री.चिंतामण वाळकोळी सर* यांचे कौतुक केले.
आतापर्यंत करत असलेल्या कामाची पावती मिळाल्याचे समाधान लाभले.वर्गातील मुलांचा ही आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचे दिसून येत होते.
*सौ.ज्योती दिपक बेलवले.*
*जि.प.शाळा केवणीदिवे.*
*ता- भिवंडी , जि- ठाणे.*
🔡🔡🔡🔡🔡🔡🔡🔡🔡
*इयत्ता - सहावी/सातवी*
*विषय - गणित*
*घटक - घातांक*
*साहित्य - रंगीत कागद , स्केचपेन इ.*
घातांकाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आज कृतियुक्त उपक्रम घेतला. रंगीत कागद घेऊन त्यावर घड्या (fold) घालून घातांकाची संकल्पना स्पष्ट केली.
उदा.
2 चा 0 वा घात म्हणजे कागदाला एकही घडी घालायची नाही म्हणजे 1
2 चा 0 वा घात = 1
दोनचा पहिला घात म्हणजे कागदाला एक घडी घालायची म्हणजे एकूण दोन भाग तयार होतात.
म्हणून
2 चा पहिला घात = 2
2 चा वर्ग म्हणजे दुसरा घात म्हणजे कागदाला दोन घड्या घालायच्या म्हणजे एकूण 4 भाग तयार होतील.
म्हणून 2 चा वर्ग = 4
दोनचा तिसरा घात (घन) म्हणजे कागदाला तीन घड्या घालायच्या म्हणजे एकूण 8 भाग तयार होतात.
म्हणून 2 चा 3 रा घात = 8
याप्रमाणे जेवढा घात तेवढ्या घड्या कागदाला घातल्यास त्या घातांकित संख्येची किंमत मिळते.
याप्रकारे पाया आणि घातांक यांचा संबंध स्पष्ट केला. रुमाल, कापड इ.वस्तूंना घड्या घालून संबंध स्पष्ट करता येतो. याप्रमाणे मुलांनी कृती करुन घातांक , पाया, किंमत समजून घेतली.
*सौ.ज्योती दिपक बेलवले .*
*जि.प.शाळा केवणीदिवे .*
*ता- भिवंडी , जि.-ठाणे*
जि.प.शाळा केवणीदिवे येथील
माझ्या मुलांनी तयार केलेल्या *बांगड्यांपासून* कलाकृती .त्या कलाकृतीत समाजशास्र विषयावर आधारित केलेले लेखन .

🌴🌱🌿☘🌾🌼🌸🍎
*व्यक्तिचित्रे*
जि.प.शाळा केवणीदिवे , ता - भिवंडी , जि - ठाणे येथील इ.७ वी तील *लावण्या पाटील* या विद्यार्थीनीने रेखाटलेली इतिहासाच्या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराज , छत्रपती शाहू महाराज , पेशवा नानासाहेब , पहिला बाजीराव ,मल्हारराव होळकर यांची व्यक्तिचित्रे.
*AIL Related Game*
*Game of collective nouns*
*Std - 4th to 8th*
चित्रकलेच्या तासिकेला विद्यार्थ्यांना कागद देवून त्यावर collective nouns शी संबंधित चित्राचे रेखाटन करुन ती त्यांच्याकडून रंगवून घेतली.काही मुलांना flash cards लेखनासाठी दिले.विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे आणि flash cards वर आधारित घेतलेला हा खेळ.हा खेळ आपण मराठी , हिंदी आणि इंग्रजी विषयासाठी घेऊ शकतो. वरील खेळाच्या व्हिडिओसाठी खालील लिंकला भेट द्या.
hthttps://youtu.be/sgZRxy82h5o
सौ.ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता - भिवंडी , जि - ठाणे.
🌸☘🌸☘🌸☘🌸☘
*Stone art*
रंगीत दगडे वापरुन निवडूंगाच्या झाडाभोवती जि.प.शाळा केवणीदिवे ...इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी मधल्या सुट्टीत केलेली कलाकृती .👆
अशा रंगीत दगडांचा वापर करुन मुले रोज सकाळी शाळा भरण्याआगोदर रांगोळी काढतात. रांगोळी काढताना एखाद्या वस्तुचे रेखाटन करतात.त्या वस्तुचे नाव मराठी , हिंदी , इंग्रजी भाषेत लिहितात .
आज दुपारी थोड्या वेगळा विचार करुन केलेले Stone art.
*सौ.ज्योती दिपक बेलवले.*
*जि.प.शाळा केवणीदिवे.*
*ता - भिवंडी , जि.- ठाणे.*
🌸☘🌸☘🌸☘🌸☘
विषय - विज्ञान , कार्यानुभव आणि कला
*उपक्रम - पाण्यातील रांगोळी आणि पाण्यातील दिवा.*
साहित्य - काचेचा ग्लास , रांगोळी , तेल, रंगीत दगड, प्लास्टिकच्या पिशवीचा तुकडा ,वातीसाठी दोरा,काडीपेटी इ.
*सादरीकरण - रिया रामराज पाटील*
*इ.७ वी.*
https://youtu.be/rJtnUeia9uQ
पाण्यातील द्राव्य (विरघळणारे) आणि अविद्राव्य (न विरघळणारे) पदार्थांचा उपयोग करुन दिवाळी सणासाठी पाण्यातील रांगोळी आणि दिवा कसा तयार करावा याचे प्रात्यक्षिक जि.प.शाळा केवणीदिच्या इ. ७ वी च्या विद्यार्थ्यांनी करुन दाखवले.या व्हिडिओच्या साह्याने मुले सहज असा दिवा स्वतः बनवून सर्जनशिलतेचा आनंद घेऊ शकतील.दिव्याच्या सजावटीसाठी आपण उपलब्ध वस्तुनुरुप बदल करु शकतो. बाजारात असे दिवे खूप महाग आहेत.चला तर खालील लिंकला क्लिक करुन पाहूया पाण्यातील दिवे. मुलांनी बनवलेला दिवा कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य द्या.
https://youtu.be/rJtnUeia9uQ
सौ.ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी , जि.ठाणे.
*दिव्यांचा स्टॕड (मनोरा) तयार करणे.*
https://youtu.be/bp8Sp15qwwY
साहित्य - दिवे,रंग किंवा उरलेल्या नेलपेंट, वहीचा पुठ्ठा , रद्दी कागद , सजावटीचे साहित्य इ.
*सादरीकरण - अर्चिता अजित पवार.*
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गेले असता दिव्यांचे मनोरे पाहिले.मुलांना या दिव्यांबद्दल थोडी माहिती दिली.ते कसे तयार करता येतील यावर चर्चा केली.दुसऱ्या दिवशी मुलांनी दिव्यांचे मनोरे तयार करुन आणले.माझी अर्चिता जेव्हा सहावीत माझ्याकडे आली तेव्हा मराठी वाचनात खूपच अडखळायची पण आता मस्त तयार झालीय.अगदी सहज बोलतेय तेही न घाबरता.अर्चिताने बनवलेला दिव्यांचा मनोरा पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://youtu.be/bp8Sp15qwwY
सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.- भिवंडी ,जि.-ठाणे
*ग्रेट भेट*
आज जिल्हा परिषद केवणीदिवे शाळेमध्ये *ग्रेट भेट*या सदराअंतर्गत *पाठयपुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळ सदस्य यांची मुलाखत* हे सदर घेण्यात आले.यासाठी FACEBOOK ,WHATSAPP, SKYPE यांचा वापर करून व्हिडीओ कॉल करण्यात आले होते.
या उपक्रमासाठी आज इयत्ता सातवीच्या वर्गाची निवड केली होती.
दोन दिवसांपूर्वी सर्व विषयांच्या अभ्यासमंडळ सदस्यांची वेळ घेतली होती.यासाठी विषयानुसार सदस्य असे..
👇👇
*मराठी*➖स्मिता गालफाडे(भंडारा)
*हिंदी*➖डॉ.रामदास काटे(पुणे)
*इंग्रजी* ➖शरद पांढरे(ठाणे)
*इतिहास* ➖विक्रम अडसूळ(अहमदनगर)
*भूगोल* ➖गौरीशंकर खोबरे(सोलापूर)
*विज्ञान*➖सुधीर कांबळे(उस्मानाबाद)
या सदस्यांशी शाळेतील मुलांनी यथेच्छ संवाद साधला.विविध प्रश्न विचारून पाठयपुस्तक कसे तयार होते ? स्वाध्याय निवड कशी होते? पाठयपुस्तक तयार व्हायला किती दिवस लागतात ?आपले शिक्षण किती ? आपले बालपण कसे गेले ?असे अनेक प्रश्न विचारून माहिती मिळविली.
मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता.
या उपक्रमामुळे मुलांना एक वेगळीच ऊर्जा मिळाल्याचे आणि प्रत्यक्ष पाठयपुस्तक निर्मिती करणाऱ्या सदस्यांशी बोलल्याचा वेगळाच आनंद दिसत होता.
प्रत्यक्ष व्हिडीओ कॉल मुळे समोरासमोर बोलत असल्याचा आनंद मुलांना मिळाला.
या उपक्रमासाठी वेळ दिलेल्या सर्व मान्यवरांचे धन्यवाद.
सौ.ज्योती दीपक बेलवले
प्राथ.शाळा केवणीदिवे
ता भिवंडी जि ठाणे.
मोत्यांची वेणी तयार करणे.
साहित्य - मोती आणि सोनेरी तार
वेणी तयार झाल्यावर मुली म्हणाल्या मॕडम आम्ही यात थोडा बदल करुन गळ्यातील ठूशी..हातातील बांगड्या आणि कानातले देखील करु.
मला मुलांमधील नवनिर्मितीचे कौतुक वाटले.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लींक ला भेट द्या.
जि.प.शाळा केवणीदिवे
ता.भिवंडी ..जि.ठाणे.
मी आणि माझ्या मुलांनी मिळून केलेले फलकलेखन 👆
स्वातंत्र्यदिनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी बॕच तयार करणे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
जि.प.शाळा केवणीदिवे.
केंद्र .. काल्हेर

रक्षाबंधनानिमित्त टाकाऊ मणी , रिबीन, कुंदन,खडे,फ्रेंडशिप बँड इ. वापरुन इ. ७ वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या.
जि.प.शाळा केवणीदिवे
केंद्र - काल्हेर
ता.भिवंडी ...जि.ठाणे.
जि.प.शाळा केवणीदिवे
केंद्र - काल्हेर
ता.भिवंडी ...जि.ठाणे.
इ. ७ वी
विषय - सा.विज्ञान
घटक - वनस्पती ..रचना व कार्ये
वर्गात वर्तमानपत्राच्या बोळा करुन तो पाण्याने ओलसर केला.त्यात मूग व फणसाच्या (द्विदल)बीया ठेवल्या. आठवडाभर निरीक्षण करण्यास सांगून सोटमूळ,अंकूर,आदिमूळ या संकल्पना स्पष्ट केल्या.मूळनिर्मीती स्पष्ट केली.
प्रत्यक्ष सोटमूळ दाखवून त्यातील भाग स्पष्ट केले.
तंतुमय मुळांची निर्मिती स्पष्ट करण्यासाठी काचेच्या बरणीत पाणी घेऊन त्याच्या तोंडावर कांदा ठेवून आठवडाभर निरीक्षण करण्यास सांगून झालेल्या बदलांच्या साह्याने तंतुमय मूळनिर्मिती चर्चेद्वारे स्पष्ट केली.प्रत्यक्ष गवताचे तंतुमय मूळ दाखवले.
ज्वारीचे रोप दाखवून आंगतुक मूळ स्पष्ट केले.
प्रत्यक्ष वनस्पती दाखवून खोड आणि त्याचे भाग , पान ,पानाचे भाग, पर्णधारेनुसार सलग,दंतेरी आणि खंडित प्रकार स्पष्ट केले.
खोडांतील पानांच्या मांडणीवरुन एकांतरीत,आवर्ती ,संमुख ,वर्तुळाकार प्रकार चर्चेद्वारे स्पष्ट केले.
जास्वंदीच्या फुलाद्वारे फुलांचे भाग स्पष्ट केले.एकदल बी आणि द्विदल बी प्रत्यक्ष बीया दाखवून चर्चेद्वारे स्पष्ट केले.
परिसरातील इतर वनस्पतींचे निरीक्षण करण्यास सांगितले .
शेवटी *सांगा मी कोण ?* *माझा उपयोग काय?*
या खेळाद्वारे मूल्यमापन घेतले.
याप्रकारे जवळजवळ आठवड्याभरात निरीक्षण ,चर्चा ,प्रयोग,परिसरभेट,खेळ इ.द्वारे पाठ स्पष्ट केला.
सौ.ज्योती दिपक बेलवले
जि.प.शाळा केवणीदिवे
ता.भिवंडी ...जि.ठाणे.
🌴🌱🌿☘🌾🌼🌸🍎🥑🥝
इयत्ता - ७ वी
विषय - मराठी
घटक - सामान्यरुप
आज सामान्यरुप मजेदार खेळातुन स्पष्ट केले. त्यासाठी पूर्व ज्ञान जागृत करुन नाम आणि प्रत्यय याचा सराव घेतला.
*उदा.*
*रोशन शाळेत जातो*
या वाक्यात
*नाम- शाळा* + *प्रत्यय -त*
अश्या वाक्यांद्वारे शब्दाला प्रत्यय लागण्यापूर्वी होणाऱ्या बदलाला *सामान्यरुप* म्हणतात. शब्दाच्या मूळ रुपाला *सरळरुप* म्हणतात हे स्पष्ट करुन मुलांकडूनच या प्रकारची वाक्ये तयार करुन घेतली .
तसेच मुलांनी
शब्दाचे सामान्यरुप न वापरता काही वाक्ये तयार केली. मोठ्याने वाचली. नंतर तेच वाक्य सामान्यरुपासह लिहिली .
*उदा*
*स्वयंम् पाऊस त भिजला*
*चूक*
*स्वयंम् पावसात भिजला*
*बरोबर*
याप्रकारची मुलांकडूनच वाक्ये तयार करुन घेतली.
नामाप्रमाणे विशेषणाचे देखील सामान्यरुप होते. त्यांना वेगळा प्रत्यय लागत नाही . हे स्पष्ट करुन माझ्या मुलांनी काही वाक्ये तयार केली.
*उदा*
*ही माझी जुनी मोठी बॕट*
*ह्या माझ्या जुन्या मोठ्या बॕटमध्ये चुना आहे.*
मुलांनी विचार करुन वाक्ये तयार करुन त्यातील *सरळरुप, सामान्यरुप , प्रत्यय* लिहिले .
विद्यार्थ्यांचे काही लेखन नमुने👇
*सौ.ज्योती दिपक बेलवले*
*जि.प.शाळा केवणीदिवे*
*केंद्र - काल्हेर*
*ता.भिवंडी , जि. ठाणे.*
*आजचा उपक्रम ...खोटे किंवा खरे कोण बोलतो ?*
इ. ७ वी
विषय - सा.विज्ञान
*घटक - सजीवसृष्टी - अनुकूलन आणि वर्गीकरण*
इ. ७ वी च्या नवीन पाठ्यपुस्तकात नवीन प्रश्नप्रकार दिला आहे...खोटे कोण बोलतो?
यामध्ये सजीवांचे वैशिष्ट्ये लिहून ते वैशिष्ट्ये खोटे असल्यास खरे वैशिष्ट्ये लिहावे असे अपेक्षित आहे.
*उदा.*
*कासव म्हणतो मी नभचर आहे.*
*उत्तर- कासव खोटे बोलतो.*
*कासव उभयचर आहे.*
अशा प्रकारची माझ्या मुलांनी वेगवेगळ्या प्रकारे स्वतः प्रश्न निर्मिती केलीय...वाचा आणि सांगा कसे आहेत.
नमुना म्हणून प्रश्न शेअर करते.
सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे.
ता.भिवंडी ...जि.ठाणे.
*आजचा उपक्रम*
इ. ७ वी
विषय - विज्ञान
घटक - सजीव सृष्टी - *अनुकूलन व वर्गीकरण*
वरील घटक शिकवला त्यानंतर
गावाच्या परिसरातील वनस्पती आणि प्राणी यांचे निरीक्षण करण्यास सांगून सजीवांतील विविधता , अनुकूलन आणि वर्गीकरण स्पष्ट केले.
वर्गातील मुलाच्या घरी विहीरीत कासव होता.पालकांच्या मदतीने तो शाळेत आणला .त्याचे निरीक्षण करुन उभयचर प्राणी आणि त्यांच्या अवयवात झालेले बदल , त्यांची त्वचा , पंजे ,रंग यांचे निरीक्षण करुन चर्चेद्वारे विविध गोष्टीची माहिती मुलांनी मिळवली . केवणीदिवे ही शाळा समुद्र खाडीच्या जवळ असल्यामुळे मासे विक्रेत्याकडून विविध प्रकारचे मासे वर्गात आणून कल्ले, पर, खवले दाखवून अनुकूलन स्पष्ट केले. तसेच कोंबडी , खेकडा,कुत्रा विविध पक्ष्यांचे निरीक्षण करण्यास सांगून प्राण्यांचे वर्गीकरण आणि अनुकूलन स्पष्ट केले.
परिसरातील विविध वृक्ष, झुडूपे,वेली, विविध रंगांची फुले दाखवून वनस्पतीतील विविधता आणि वर्गीकरण स्पष्ट केले.
प्रत्यक्ष निवडूंग दाखवून वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींचे अनुकूलन स्पष्ट केले. उंच वृक्ष दाखवून जंगलातील वनस्पतींची अनुकूलन स्पष्ट केले. अशोकासारखी शंकू आकाराची झाडे दाखवून हिमप्रदेशातील वनस्पतींचे अनुकूलन स्पष्ट केले. वेलींवरील तणाव दाखवले.
प्राण्यांच्या वर्गीकरणावर आधारित या लिंकवरील मी स्वतः तयार केलेला व्हिडीओ दाखवला..
https://youtu.be/lucuVRjw0Jw
प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने वेगळा आनंद मुलांना मिळाला.प्रत्यक्षात सर्व प्राणी पाहता आले त्यांची माहिती मिळाल्यामुळे मुले प्रत्येक प्रश्नाची उत्तरे स्पष्ट पणे देत होती.

*माणूस एक माती*
*जपुया माणुसकीची नाती*
काही दिवसांपुर्वी मी , मंगल डोके, छाया बागुल, शालिनी साळूंखे आणि जि.प.शाळा केवणीदिवे येथील इ.५ वी ,६ वी ची मुले यांनी काल्हेर ,ता.भिवंडी, जि.ठाणे येथील *स्मित वृद्धाश्रम आणि सुश्रूषा केंद्र* येथे नियोजित भेट दिली.
संध्याकाळी कार्यशाळा आटपून घरी निघाले होते.मैत्रिणींसोबत गप्पांचा फड चांगलाच रंगला होता.गप्पा मारता मारता काल्हेर मधील वृद्धाश्रमाचा विषय निघाला.काल्हेर मध्ये वृद्धाश्रम आहे याची कुणालाही पुसटशी कल्पना देखील नव्हती. माझी उत्सुकता शिगेला पोहचली. मी वृद्धाश्रमाबाबत चौकशी केली.परंतु कुणालाही याबाबत जास्त माहिती नव्हती .मी मंगलला म्हणाले ," आपण जाऊयात का वृद्धाश्रमात ?? मुलांना घेऊन जावू?"
मंगलने लगेचच होकार दिला. दुसऱ्या दिवशी दुपारी शाळा सुटल्यावर चौकशीसाठी आम्ही वृद्धाश्रमाच्या दिशेने निघालो.पत्ता माहित नव्हता तरीही शोधत निघालो. बंदराजवळ आलो.तरीही वृद्धाश्रम दिसेना.एका मंदिराजवळ एक इमारत होती. त्या इमारतीत वृद्धाश्रम होते. दुपारच्या उन्हाने शरीराची लाही लाही झाली असताना वृद्धाश्रम दर्शनाने मनाला गारवा लाभला. प्रवेश करताच एका छोट्या केबिनध्ये योजना घरत मँडमांनी भेटीच्या प्रयोजनाबाबत विचारणा केली. आम्ही शाळेची मुले घेऊन वृद्धाश्रमात येणार याचा त्यांना खूपच आनंद वाटला.भेटीचा दिवस , वेळ इ. ठरवल्यावर ओझरती भेट आम्ही वृद्धाश्रमास दिली.
शाळेत आल्यावर मुलांना कल्पना दिली. वृद्धाश्रमास छोटीशी मदत म्हणून मुलांना घरुन मुठभर धान्य आणण्यास सांगितले कारण त्यांना देखील समाजऋणाची जाणीव व्हायला हवी..मुलांनी जवळजवळ ५० किलो पेक्षा जास्त धान्य जमा केले. बिस्किटचे पुडे घेऊन मुले तयार झाली.
ठरल्या दिवशी सकाळी शाळेत आलो.परिपाठात वृद्धाश्रमात गेल्यावर कसे वागावे याबाबत थोड्या सुचना दिल्या .शाळा सुटल्यावर आम्ही वृद्धाश्रमात निघालो. वृद्धाश्रमातील आजी पहिल्या मजल्यावर होत्या.तेथे काही मुली आणि बागुल बाई थांबल्या. दुसऱ्या मजल्यावर फक्त आजोबा होते. तेथे मुलगे आणि मंगल बाई थांबल्या.तिसऱ्या मजल्यावर आजीआजोबांसाठी स्पेशल रुम होत्या .त्यांना एकत्र घेऊन मुलेमुली आणि साळूंखे बाई थांबल्या. आम्ही सर्वांनी छान गप्पा मारल्या.मुलांनी आजीआजोबांची मुलाखत घेतली.चौकशी केली.
त्यातील एक आजी कुंभमेळाव्यात हरवलेली आहे.एका आजीने *प्यासी आत्मा* या चित्रपटात अभिनय केला आहे.मुलांनी तिचा आॕटोग्राफ देखील घेतला..एक आजोबा असे आहेत ज्यांचे मुले,मुली,सुना डाँक्टर आहेत.अशीही आजी जिने स्वातंत्र्य संग्राम पाहिलाय.भारत पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्या भारतात आल्या होत्या.उत्तरप्रदेशातील आजोबा आहेत जे अस्खलित इंग्रजी बोलतात.असे कित्येक जण होते.
या सर्वांना आमच्या मुलांना भेटून झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता.तेव्हा जाणवले की उतारवयातील आजीआजोबांना *लहान मुलांचा सहवास* म्हणजे एक उत्तम टाॕनिक असते.
आमच्या मुलांचे मला,मंगलला,छाया बाईंना आणि साळूंखे बाईंना खूप कौतुक वाटले.कारण इतरवेळी मस्ती करणारी ही मुले खूपच जबाबदारीने आणि लहानवयात प्रौढत्व आल्यासारखी वागत होती.
आमच्या मुलांनी श्रमदान केले, आजींचे केस विंचरले, पायाला बाम लावून पाय दाबले , तुटलेले बटण लावून दिले , गाणी गायले , नाच केला, नाट्य केले , विनोद सांगितले अशा बर्याच गोष्टी की ज्याने आजीआजोबांना आनंद वाटेल.एक आजी ख्रिश्चन धर्माची होती. तिला मराठी बोलता येत नव्हते पण समजत होते.तिला हिंदी आणि इंग्रजी बोलता येत होते.तिला मुलांशी बोलायचे होते.पण मराठी येत नव्हते .जेव्हा आमच्या मुलांनी हिंदी आणि इंग्रजीतुन त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा तिला झालेला आनंद आवर्णनिय.त्यांना उठून बसले की जुलाबाचा त्रास व्हायचा.त्यामुळे पँड लावला होता.परंतु मुलांनी त्यांच्या काँटजवळ जावून त्यांच्याशी संवाद साधला.गप्पा मारल्या.
एका आजीने देखील नाच केला.एका आजीने *दादा मला एक वहिनी आण* हे गाणं त्या गायल्या आणि मुलांना त्यावर नृत्य करायला सांगितले .
आजीआजोबा देखील मुलांत मूल झाले होते.सगळा एकांकीपणा त्यावेळी बाजुला ठेवून याक्षणांचा आनंद अनुभवत होते .
एक आजोबा म्हणाले ," रोज येथे शांतता असते.आज या निरागस मुलांचा चिवचिवाट ऐकून निरव शांततेची जागा चैतन्याने घेतलीय.आज गोकुळात गेल्याचा भास झाला.कुटूंबात असल्याचा आनंद आणि नातवांचा सहवास आज आम्हाला मिळाला."
डाँ.बोरकर धुळे येथील माझ्या भाच्याने मला येऊन भेटावे अशी अपेक्षा एका आजीने व्यक्त केली. त्या आजीला विणकामाची आवड होती .तिने आम्हाला विणलेले रुमाल भेट म्हणून दिले.
एकंदर वातावरणावरुन त्यांना घरची कुटूंबाची आठवण येत होती.पण आश्रमात योग्य रितीने काळजी घेत असल्याने सर्व आनंदात होती.
आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी खास होता. मुलेही आनंदी होती.आम्ही परत जायला निघालो त्यावेळी *पुन्हा या भेटायला* अशी आर्त साद त्यांनी दिली.योजना मँडम म्हणाला ," गेल्या चार वर्षांपासून येथे वृद्धाश्रम चालवतेय. पण आजचा दिवस आजीआजोबांचा सर्वात आनंदी दिवस . चार वर्षात दोन शाळांची मुले भेटीला आली. एक इंग्रजी माध्यमाची शाळा आणि दुसरी जि.प.शाळा केवणीदिवे .
घरत मँडम आणि आजीआजोबांनी मुलांचे तिन्ही भाषेवर प्रभुत्व आहे असे सांगून मराठी ,हिंदी ,इंग्रजी भाषेतील ज्ञानाचे कौतुक केले. भेट दिलेल्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांपेक्षा आमची मुले सर्वच बाबतीत सरस आहेत असे सांगून त्यांना शाबासकी दिली .शाबासकीने आम्ही आणि मुले सुखावलो.परत भेटीला येण्याचे अभिवचन देऊन जड पावलांने सर्वांचा निरोप घेतला.
ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे
ता.भिवंडी ..जि.ठाणे.
कार्यानुभव उपक्रम 👆
शंखावरील कलाकृती
कागदी पाकीट
कागदी फुले
जि.प.शाळा केवणीदिवे
ता..भिवंडी ..जि..ठाणे.
*आज १० मार्च*
*देशातील पहिली*
*महिला स्त्री शिक्षीका*
*ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले*
यांना स्मृतिदिनानिमित्त माझ्या वर्गातील *पूर्वा उमेश पाटील* हिने सादर केलेले एकपात्री नाट्यछटा खालील लिंकवर पहा.
येथे क्लिक करा.
सौ.ज्योती दिपक बेलवले
जि.प.शाळा केवणीदिवे
ता..भिवंडी ...जि..ठाणे.
💐💐💐🙏🙏🙏
*जय ज्योती जय क्रांती*
👩🚒👩✈👩💼👩🎨🤴🏃♀🙍👩💼👩🔧👩🏭👩⚕
*जागतिक महिला दिन*
*तिचे पंख तिचे आभाळ*
आज दि.८ मार्च २०१७ रोची जि.प.शाळा केवणीदिवे येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात मुलांनी करुन महिलादिनाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग कौतुकास्पद होता.संपूर्ण कार्यक्रमाची धुरा विद्यार्थ्यांनीच सांभाळली.महिला दिनाचा इतिहास मुलांनी सांगितला .
या कार्यक्रमासाठी केवणीदिवे गावातील *डाँ. अभिजित कापसे* हे प्रमुख मार्गदर्शक लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य , चांगल्या सवयी, आहार आणि विहार , किशोरवयीन मुलींच्या समस्या ,शारीरिक वाढ आणि बदल इ. बाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी स्वरचित तर काहींनी संकलित महिलांची प्रगती ,वैशिष्ट्ये,स्त्री भ्रुणहत्या,समाजाचा दृष्टिकोनावर आधारीत कवितांचे काव्यगायन केले.
*तिचे पंख तिचे आभाळ* या विषयावर मुलींनी उत्तम *परिसंवादाचे* सादरीकरण केले. या परिसंवादात *महिलांच्या स्थितंतरे,प्रगती,विविध योजना,चुकीच्या समजुती इ.* विषयावर प्रकाश टाकण्यात आला.
सकारात्मक विचाराने कार्यक्रमाची सांगता *असू दे असू दे मुलीचा जन्म असू दे* या गीताने झाली.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
शब्दांकन
ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी ...जि.ठाणे.
👩💼👩⚕👩🏭👩🔧🙍🏃♀🤴👩🎨👩✈👩🚒🤶
🍊🥒🍆🍪🥒🍪🍆🍊🥒🍪🍆
*आजचे उपक्रम*
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान जत्रा*
*आणि*
*बाजार*
*जि.प.शाळा केवणीदिवे*
*ता.भिवंडी ..जि.ठाणे.*
मार्गदर्शक- सौ.ज्योती दिपक बेलवले.
सौ.मंगल सतिश डोके.
श्री.चिंतामण लहू वाळकोळी
आज दि.२८ फेब्रुवारी रोजी जि.प.शाळा केवणीदिवे येथे इ.५ वी आणि ६ वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात विविध *वैज्ञानिक प्रयोग, खेळ,गंमत* यावर आधारित प्रात्यक्षिके करुन दाखवून वैज्ञानिक तत्व स्पष्ट केले. *विज्ञानजत्रा* अनुभवली. या जत्रेत शास्त्रज्ञांचा जीवन परिचय आणि त्यांचे कार्य यावर प्रकाश टाकण्यात आला.
इ.५ वी,६वी च्या काही (जे प्रयोगात सहभागी नाहीत असे) मुलांनी पटांगणात
*बाजार* भरवला.या बाजारात भाज्या , फळे, पापड,शृंगाराचे साहित्य , शालोपयोगी वस्तू , खाऊंचे वेगवेगळे प्रकार इ. चे दुकान मांडण्यात आले.या उपक्रमातुन *खरेदी किंमत , विक्री किंमत , मापन,नफा,तोटा,निव्वळ नफा* इ. संबोध प्रत्यक्ष अनुभवाद्वारे शिकली.केवणीदिवे गावात बाजार भरत नसल्याने *बाजार* म्हणजे नेमके काय हे देखील मुलांना अनुभवता आले.वेगळा अनुभव आणि आनंद मुलांना या द्वारे देण्यात आला.
शब्दांकन
सौ.ज्योती दिपक बेलवले.
💦🌔🌞🏹🎣🚀🛰⛲⚖💉🔍
*compound words*
Objectives - Able to know compound words with joyful way by matching pictures of various trees.
Material - waste boxes, oil pastel colours , sketch pens etc.
Out comes - students play the game and learn compound words.
Process of implement -Take a cardboard of waste box .Tell to draw picture of various tree . Colour these trees and cut them into three pieces . Take upper part of tree and write description of compound word.On the second part of tree's trunk write first word of compound word. On the last part of tree's trunk write last word of compound word.Mix up all parts of various trees.Tell them to match the proper pair of describing word and compound word.
eg.....
mat kept on the door
door
mat
door mat.
*Jyoti Deepak Belawale*
for short demo of this activity ...visit
येथे क्लिक करा.
आज जि.प.प्राथ.शाळा केवणीदिवे ..ता.भिवंडी ..जि.ठाणे. येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमीत्त रणजीत इ.५ वी आणि मयांक इ.६ वी यांनी शिक्षकांच्या मदतीने सुंदर फलकलेखन करुन वातावरण निर्मिती केली.सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली.
कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. इ.५वी आणि ६वी च्या विद्यार्थ्यांनी नृत्यावर आधारित फ्वाँलिक्स प्रकार सादर केले.विशेष म्हणजे या मुलानी फक्त दिड दिवसात हे नवीन प्रकार सराव करुन सादर केले.
इ.७वी आणि ८वी च्या विद्यार्थ्यांनी (मुलगे) झांज प्रकार सादर केले तसेच मुलींनी लेझीम प्रकार सादर केले.हे प्रकार शिकवण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे संदिप पाटील सर ,ज्योती राजगुरु आणि त्यांची टीम यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.अगदी आँर्डर देखील पूर्वा इ.६वी. हिने दिली.संचलन रंजित इ.५वी ने केले तसेच राष्ट्रध्वज प्रतिज्ञा सिद्धांत इ.६ वी याने दिली.ढोल ताशे मुलांनीच वाजवले.
एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांच्या मधील सभाधिटपणा विकसनासाठी पोषक वातावरण निर्माण झाले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक..चिंतामण लहू वाळकोळी आणि सर्व शिक्षक वृंद यांची मेहनत आणि सहकार्य लाभले.
शब्दांकन
सौ.ज्योती दिपक बेलवले.
फ्वाँलिक्स प्रकार पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://youtu.be/m_cobM9zvk8
झांज प्रकार पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/RQ_6wmpsi-w
🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀
*4 D आंतरेंद्रिये*
🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀
आज जि.प.शाळा केवणीदिवे येथील विद्यार्थ्यांना *Anatomy 4D*
या app द्वारे मानवी शरीरातील आंतरेंद्रिये , त्यांचे कार्य , रचना, त्यांची हालचाल इ. बाबी प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट केले . तसेच प्रत्यक्ष मोबाईल विद्यार्थ्यांना हाताळण्यास दिला. आंतरेंद्रियांबाबत विद्यार्थ्यांमध्ये कुतुहल होते.विद्यार्थी आनंदाने आणि आश्चर्याने सर्व बाबी समजून घेत होते.
🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀
*दत्तक मित्र*
विद्यार्थींची प्रगती सुधारण्यासाठी राबवलेला उपक्रम
दत्तक मित्र या उपक्रमांतर्गत हुशार विद्यार्थ्यांना गतीमंद ( अभ्यासात मागे असणारी/ अभ्यासाची गती मंद असणारे ) विद्यार्थी दत्तक दिला.
म्हणजे मित्राला मित्र दत्तक दिला आणि स्वतः देखील लक्ष देऊन तसेच अभ्यास कसा आणि काय घ्यावे याबाबत हुशार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन राबवला.
या उपक्रमाचा result खूपच छान आला.
दत्तक मित्र देताना एकमेकांच्या घराजवळ राहणाऱ्या मित्रांची जोडी केली.त्याने शाळा सुटल्यानंतर घरी एक तास तसेच शाळेत मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटण्याच्या आधी अर्धा तास दत्तक मित्राची अभ्यासातील अडचण सोडवावी.
याप्रकारे मी हा उपक्रम घेते.
*ज्योती दिपक बेलवले .*
😇😇😇😇😇😇😇😇😇
इ .6 वी
विषय - गणित
घटक - समीकरणे
😇😇😇😇😇😇😇😇😇
समीकरण कसे तयार करावे . यासाठी प्रथम चित्र (आकृती ) च्या साह्याने स्पष्टीकरण करून नंतर गावातील चित्रकृती काढून त्याद्वारे समीकरण तयार करण्यास सांगितले . मुलांची कल्पकता एवढी की एका चित्रकृतीवरून अनेक समीकरणे तयार केली .
मुलांची कल्पनाशक्ती अफाट असते .
समस्या निर्माण करून त्यांना विचार करण्याची संधी दिली तर खूप वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात .
😇😇😇😇😇😇😇😇😇
ज्योती दिपक बेलवले.
(ATM )
जि. प. शाळा केवणीदिवे
ता. भिवंडी ... जि - ठाणे
😇😇😇😇😇😇😇😇😇
*कलेतून शिक्षण शिक्षणातून आनंद..*
🌺☘🌺☘🌺🍀
*उटणे विकून मिळालेल्या नफ्यातून घेतले bluetooth speaker*
🌺☘🌺☘🌺☘🌺
गेल्या वर्षी दिवाळीसाठी कार्यानुभव अंतर्गत
*आयुर्वेदिक सुगंधी उटणे*
तयार करणे हा उपक्रम घेतला होता. प्रत्येक मुलाला एक पॅकेट उटणे दिवाळीनिमित्त घरी न्यायला दिले होते. उटण्याचा सुगंध आणि उत्तम दर्जा असल्याने या वर्षी दिवाळी आधीच पालकांनी मुलांमार्फत निरोप पाठवले की उटणे विकत मिळेल का?
आणि मग एक कल्पना सुचली....
या वर्षी उटणे तयार करून विकायचे . त्यासाठी लागणारे सर्व साहित्य जमा करून परीक्षेच्या पंधरा दिवस आधी शाळेत उटणे तयार केले. मुलांना गावात किती पाकीट उटणे लागेल याचा अंदाज यावा म्हणून उटण्याची order घ्यायला सांगितली. सर्व मुलांची order एकत्र करून अंदाज घेऊन साहित्य आणले आणि
वर्गातील मुलांच्या मदतीने उटणे तयार केले . ते पाकिटात पॅक करून ज्या मुलांना स्वखुशीने उटणे गावात विकायचे आहे त्यांना उटण्याचे पाकीट दिले . प्रत्येकी १०₹ ला पाकिटाची किंमत ठेवली . दुसऱ्या दिवशी मुलांनी विकलेल्या उटण्याचे पैसे जमा करून आणखीन उटणे विकण्यास नेले . उटणे विकण्याची कुणालाही जबरदस्ती केली नाही . मुलांनी तीन दिवस शाळा सुटल्यावर उटणे विकले . या सर्व व्यवहारात जो वर्गाला नफा झाला त्या पैशातून आम्ही वर्गासाठी *bluetooth speaker* घेण्याचे ठरवले.
bluetooth speaker online खरेदी करण्याचे ठरवले.
त्यासाठी amozon वर order कशी द्यायची हे प्रात्यक्षिकाद्वारे मुलांना स्पष्ट केले. bluetooth speaker मुलांना खूप आवडला.या speaker चा उपयोग परिपाठासाठी ,कविता,इंग्रजीच्या पाठाचे वाचन,गाणी इ. साठी करतो.
हे bluetooth speaker wireless आणि chargeing ची सुविधा असल्याने वापरायला सोपे आहे. आकाराने लहान आणि वजनाने हलके असल्याने carry करण्यास easy आहे.लोडशेडिंग असेल तरी आपण याचा वापर करू शकतो .
स्वतःच्या पैशांतून हा speaker घेतल्याने एक वेगळाच आनंद विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.
यामुळे विद्यार्थ्यांना एखादा छोटा व्यवसाय कसा सुरु करावा याचे थोडक्यात प्रात्यक्षिकासह ज्ञान मिळाले .
🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺
सौ. ज्योती दिपक बेलवले.
सुगंधी उटणे तयार करणे
सुगंधी उटणे...अंदाजे सव्वा किलो
साहित्य व प्रमाण .
१०० gr नागरमोथा
२०० gr कचोरा..गव्हाला
५० gr कापूर काचरी
५० gr आवळकाठी
५० gr बावची
५० gr लोध
१० gr ब्राह्मी
१० gr वाळा
१० gr माका
१० gr सोनकेवडा
१० gr आंबेहळद
१० gr मुलतानी माती
५० gr संत्रा साल
५० gr कडूनिंब पाने
५० gr तुळसी पाने
१५० gr मसूरडाळ
५००gr बेसन
१० gr अश्वगंधा
१०gr गुलाबाच्या पाकळ्या
कृती.
जे साहित्य परिसरातून मिळेल ते विद्यार्थ्यांना जमा करायला सांगावे आणी बाकीचे साहित्य विकत घ्यावे.खलबत्यात कुटून बारिक करुन चाळणीने चाळून घ्यावे.सर्व पदार्थ चांगले एकत्र मिसळावे.प्लास्टिक पिशव्यात पँक करुन वाटावे..झाले तयार उटणे.
भोंडला
आज दि.१०/१०/२०१६ रोजी जि.प.शाळा केवणीदिवे येथे भोंडला साजरा करण्यात आला.भोंडल्याच्या पारंपारिक गीतांवर मुलांनी ताल धरला.डब्यातील आवाजावरुन डब्यातील सुका खाऊ ओळखणे हा खेळ घेतला.नंतर ससर्व खाऊ एकत्र करुन सर्वांना खिरापतीची मेजवानी दिली.
नवरात्री निमित्त वेशभुषा स्पर्धा घेऊन आधुनिक आदिशक्ति ..कर्तबगार महिलांचा परिचय करुन दिला.त्यांचे कार्य विशद करुन प्रेरणा निर्माण केली.
सौ. ज्योती दिपक बेलवले.
अभिव्यक्ती हंडी
सौ.ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी ..जि.ठाणे.
साहित्य - हंडी , चिठ्ठ्या, काठी इ.
कृती - गोपाळकालानिमित्त वर्गातील मुलामुलींचे मानवी मनोरे याचे प्रात्यक्षिके घेतली. मुलांनी त्यांच्या कल्पकतेने नवीन मनोरे तयार केले.गवळणींचे गायन केले.
घरात लग्नाला पुजतात त्यातील एक टाकाऊ छोटे मडके घेतले.त्या हंडीत चिठ्ठ्या टाकल्या.प्रत्येक चिठ्ठीवर एक कृती लिहिली .जसे...गोष्ट सांग, कविता म्हण, आवडत्या पक्ष्याचे वर्णन कर, गवतफुलाचे वर्णन ,विनोद सांग, गाणे म्हण,नृत्य कर इ.कृती लिहिल्या. हंडी वर बांधली.उंचीप्रमाणे मुलांना उभे करुन एक काठी देऊन उडी मारुन हंडी फोडण्यास सांगितले .हंडी फुटल्यावर त्यातील खाली पडलेल्या चिठ्ठ्यांपैकी प्रत्येकाला एक चिठ्ठी उचलण्यास सांगून प्रत्येक मुलाला पुढे येऊन मोठ्याने चिठ्ठी वाचण्यास सांगून त्यावर लिहिलेली कृती करण्यास सांगितले .
यामुळे मुलांचा शारीरिक विकास होऊन धाडसीवृत्ती वाढते.सभाधिटपणा वाढून मुले अभिव्यक्त होतात म्हणून ही हंडी म्हणजे अभिव्यक्ती हंडी होय.
आजचा उपक्रम
पाखरांच्या शाळेसंगे माझा वाढदिवस.
सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे.
ता.भिवंडी..जि.ठाणे.
साहित्य - जुने पुठ्ठ्याचे बाँक्स,घोटीव कागद, फेविकाँल,स्केचपेन इ.
कृती - शाळेतील पूरक आहारातंर्गत बिस्किटांचे रिकामे पुठ्ठ्याचे बाँक्स होते. त्या टाकाऊ बाँक्सचे पुठ्ठे वेगवेगळे करुन त्यांचे पक्ष्यांचे आकार कापले.माझा पट ४८ असल्याने ४८ पक्षी बनवले.त्या पक्ष्यांच्या आकारावर रंगीबेरंगी घोटीव कागद लावले.प्रत्येक पक्ष्यावर एक एक मुलाचे नाव आणि जन्मदिनांक लिहिली . वर्गाला दोन दरवाजे असल्याने एक दरवाजा नेहमीच बंद असतो.त्या दरवाज्यावर पक्षी तारेवर बसल्याप्रमाणे चिटकवले.कोलाजकामांतर्गत ढग आणि झाड काढून त्यास वेगळेपण दिले.
प्रत्येक मुलाचे नाव आणि जन्मदिवस लिहिल्याने मुले खूप खूष झाली.एकमेकांना जन्मदिवस पाहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ लागले.टाकाऊतून नवनिर्मिती करण्याची दिशा मिळाली.कलात्मकतेचा आणि सृजनशिलतेचा विकास झाला.
माझ्या वर्गातील वर्ग मंत्रिमंडळ ..
वर्गाचे अभ्यासगट..
इ.६ वी नवीन अभ्यासक्रम ..
इंग्रजी विषयावर तयार केलेले साहित्य आहे.हे तयार करण्यास मला रिया(माझी लेक)जी आता सहावीलाच गेलीय तिने मदत केली..
साहित्य तयार करताना पाठ्यपुस्तकाचा विचार करुन नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे.टाकाऊतून साहित्य निर्मिती केलीय. जुन्या पत्रावळीपासुन फुले तयार केलीत.पाठ्यपुस्तकाबाहेरील परंतु घटकासंबंधी माहिती आहे.ती शोधण्यास रियाची मदत खूपच झाली.तिने देखील हे सर्व आवडीने केलय..म्हणजेच माझी मुले देखील शाळेत इंग्रजी आवडीनेच शिकतील..
🕷🐊🐘🐄🌳🌺🍃🌙🌞🐿
उपक्रमाचे नाव
मी नाम (नामांचे प्रकार)
भाग..१
इ.६वी मराठी नवीन अभ्यासक्रम
या उपक्रमासाठी काही निवडक चित्रे घेतली.या चित्रांचे रेखाटन व रंगकाम मुलांमार्फत करुन घ्यावे..सुट्टी असल्याने हे सर्व माझी बछड़ी रियाने केलय.
ही सर्व चित्रे एका ठराविक आकाराच्या कार्ड वर काढली.ही कार्डे बसतील अशी एक चौकट तयार केली..हे साहित्य तयार करण्यासाठी एक आकर्षक लग्नपत्रिकेचा वापर केलाय.एक एक चित्र चौकटीत टाकून त्याचे सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम सांगण्यास सांगितले ...
उदा.
🐕
सामान्य नाम..कुत्रा
विशेष नाम..मोती
भाववाचक नाम...चातुर्य
🐕
सामान्य नाम..कुत्री
विशेष नाम..चंपा
भाववाचक नाम..चपळता
याप्रकारे मुलांना जसे सुचेल तसे नामांचे नमुने घेऊन विविधता आणता येईल..वेगवेगळ्या चित्रांच्या साह्याने अधिक सराव घेता येईल..
या उपक्रमामुळे मुले विचार करुन नामांचे प्रकार सांगतील.कृतियुक्त सहभाग घेतील.खेळाद्वारे आनंदी वातावरणात नामांचे प्रकार शिकतील..
✍ निर्मिती व लेखन ✍
*सौ.ज्योती दिपक बेलवले*
जि. प. शाळा केवणीदिवे.
ता.भिवंडी
जि.ठाणे.
🔹 *कृतिशिल शिक्षक महाराष्ट्र* 🔹
*(ATM)*
🐢🕷🐊🐘🐄🌳🌺🍃🌙🌞🐿🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧
आज जि प शाळा केवणीदिवे येथे जलजागृती सप्ताह अभियाना अंतर्गत सकाळी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सरपंच व पदाधिकारी , शा.व्य. समिती , माता पालक संघ , पालक शिक्षक संघ या सर्वांच्या उपस्थितीत प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली.
प्रभातफेरीसाठी मुलांनी बरेचसे स्वलिखीत घोषवाक्ये तयार केली.काही मुलांनी संग्रही घोषवाक्यांचा देखील उपयोग केला.
यावेळी पाणी हे किती महत्वाचे असून त्याचा वापर किती जपून केला पाहिजे तसेच सध्या महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ आहे त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे .व पाण्याचे महत्व या विषयावर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले
शाळेत 'पाणी 'या विषयावर विविध कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये..
निबंधस्पर्धा
चित्रकला स्पर्धा
वत्कृत्व स्पर्धा
घेण्यात आल्या.
विविध उद्बोधन पर गीते,कविता,गाणी व भारुड म्हटले.परिपाठात गीताचे गायन घेतले.
होळी,धुलीवंदन व रंगपंचमीला पाण्याचा अपव्यय करणार नाही असा संकल्प करुन आजूबाजूच्या घरात देखील पाण्याचे महत्व समजावून सांगण्याचे ठरले.
एकंदर सकारात्मक दृष्टीने
"पाणी बचत..पाणी संवर्धन"
या विषयांवर मुलांनी आपले विचार करुन दाखवले.
चला तर मग पाण्याचे महत्व समजून घेऊया व इतरांना ही सांगूया.
"पाणी म्हणजेच जीवन"
💧💧💧💧💧💧💧
🌧🌧🌧🌧🌧🌧🌧
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र
(ATM )
ज्योती दिपक बेलवले
जि. प.शाळा केवणीदिवे
भिवंडी ठाणे
अभिव्यक्ती दिन
जंगलबुक
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र
ज्योती दिपक बेलवले .
आज मुलांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन गेले.जाताना मुलांना प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करण्यास सांगितले .वाटेत खाडीकिनारी पाणसापाने घातलेली अंडी पाहिली...छोटे बंदर पाहिले...रेती व्यवसाय ...माती कशी तयार होते.. डोंगर...वेगवेगळ्या वनस्पती व त्यांचे उपयोग जाणून घेतले...जमिनीची धूप होऊ नये यासाठी उपाययोजना...वडाच्या पारंब्यांवर झोके...झाडावर चढणे...बेचकीने नेम धरुन चिंचा...कैर्या पाडणे इ. वेगवेगळे अनुभव मुलांना दिले.सहभोजन, गाणी,नृत्य ,विनोद ,खेळ इ.गोष्टींची मजा घेत..हसतखेळत ,निरीक्षणाने ,अनौपचारिक शिक्षण दिले.
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)
ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी ..जि.ठाणे.
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
🌺 English friend ,....benches 🌺
इंग्रजी विषयाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी व इंग्रजी वाचनाची भिती नाहीशी होण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न .शब्दांची सुरुवात सारख्याच अक्षर गटाने होत असल्याने..वाचन सहज शक्य व आवड देखील निर्माण होते. त्याच बरोबर ज्या शब्दाचा अर्थ माहिती नाही ..तो जाणून घेण्यासाठी इंग्रजी शब्दकोशाचा वापर करुन अर्थ शोधल्याने ..जिज्ञासा जागृत होऊन.स्वयंशोधन प्रवृत्तीने अर्थ शोधला जातो.शब्द बाकावरच लिहल्याने ते खूपच जवळचे वाटतात. वाचन हसतखेळत होते. कुठलेही टेंशन न घेता.मधल्या सुट्टीत वाचन व अर्थ शोधायचा,.मदत लागलीच तर आधी मित्रांची घ्यायची. अगदिच आवश्यकता असल्यास शिक्षकांची मदत घ्यायची. मुले आनंदाने सहभागी होतात. एकमेकांना सहकार्य करतात.
ज्योती बेलवले
शाळा...केवणीदिवे..भिवंडी ..ठाणे.
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝

नवरात्रीनिमित्त वेशभुषा स्पर्धा ( आधुनिक आदिशक्ति )

जि.प.शाळा केवणीदिवे येथे अभिव्यक्ती दिन साजरा करण्यात आला.यावेळी इ.८वी व ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
या उपक्रमात मुलांनी
🌸 पंधरा एकपात्री प्रयोग
🌸 एक बोलीभाषेतील (आगरी) नाट्य
🌸 सहा प्रमाणभाषेतील नाट्य
🌸 गीतगायन
🌸 मराठी भाषेचे महत्व
🌸 पाठ्यपुस्तकातील प्रसंगाचे नाट्यीकरण..(मराठी..हिंदी ..इंग्रजी )
🌸 भजन..कीर्तन
🌸 शाळेवर आधारीत उखाणे.
🌸 व्यक्ती परिचय
🌸 संवाद
🌸 फलकलेखन..रांगोळ्या..इ.
वेगवेगळ्या प्रकारे मुलांनी सादरीकरण केले.
मार्गदर्शक शिक्षक
ज्योती बेलवले
मनिषा पगारे.
मंगल डोके
शालिनी साळूंखे
चिंतामण वाळकोळी..मुख्या.
शब्दांकन
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र
(ATM)
ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी ..जि.ठाणे.
जंगलबुक
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र
ज्योती दिपक बेलवले .
आज मुलांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन गेले.जाताना मुलांना प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करण्यास सांगितले .वाटेत खाडीकिनारी पाणसापाने घातलेली अंडी पाहिली...छोटे बंदर पाहिले...रेती व्यवसाय ...माती कशी तयार होते.. डोंगर...वेगवेगळ्या वनस्पती व त्यांचे उपयोग जाणून घेतले...जमिनीची धूप होऊ नये यासाठी उपाययोजना...वडाच्या पारंब्यांवर झोके...झाडावर चढणे...बेचकीने नेम धरुन चिंचा...कैर्या पाडणे इ. वेगवेगळे अनुभव मुलांना दिले.सहभोजन, गाणी,नृत्य ,विनोद ,खेळ इ.गोष्टींची मजा घेत..हसतखेळत ,निरीक्षणाने ,अनौपचारिक शिक्षण दिले.
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)
ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी ..जि.ठाणे.
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
🌺 English friend ,....benches 🌺
इंग्रजी विषयाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी व इंग्रजी वाचनाची भिती नाहीशी होण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न .शब्दांची सुरुवात सारख्याच अक्षर गटाने होत असल्याने..वाचन सहज शक्य व आवड देखील निर्माण होते. त्याच बरोबर ज्या शब्दाचा अर्थ माहिती नाही ..तो जाणून घेण्यासाठी इंग्रजी शब्दकोशाचा वापर करुन अर्थ शोधल्याने ..जिज्ञासा जागृत होऊन.स्वयंशोधन प्रवृत्तीने अर्थ शोधला जातो.शब्द बाकावरच लिहल्याने ते खूपच जवळचे वाटतात. वाचन हसतखेळत होते. कुठलेही टेंशन न घेता.मधल्या सुट्टीत वाचन व अर्थ शोधायचा,.मदत लागलीच तर आधी मित्रांची घ्यायची. अगदिच आवश्यकता असल्यास शिक्षकांची मदत घ्यायची. मुले आनंदाने सहभागी होतात. एकमेकांना सहकार्य करतात.
ज्योती बेलवले
शाळा...केवणीदिवे..भिवंडी ..ठाणे.
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
आज गावातील सप्ताहाचा शेवटचा दिवस.गावातील पालखी सोहळा.या सोहळ्यात सहभागी होऊन लेझीम करताना केवणीदिवे शाळेच्या मुली...
🌺🌺उपक्रम 🌺🌺
क्षेत्र भेट घटकाअंतर्गत
कापड उदद्योगास भेट
ठिकाण=सर्वम ट्रेडिंग कंपनी
काल्हेर
👇👇
इयत्ता आठवीच्या भूगोल विषयात
क्षेत्रभेट हा घटक आहे.
या घटकामध्ये छोटे उद्योग
व मोठे उद्योग असे वर्गीकरण आहे.
छोट्या उद्योगामधे गावातील विविध ठिकाणाना भेटी देऊन झाल्या होत्या.
आता मुलांच्या मनात उत्सुकता होती ती मोठ्या कारखान्यास भेट देणे व त्याठिकाणी कशा प्रकारे काम केले जाते ,तसेच कच्चा माल कसा प्राप्त केला जातो ? कच्च्या मालावर कशाप्रकारे प्रक्रिया करून पक्क्या मालात त्याचे रूपांतर केले जाते?
त्यासाठी मजूर किती असतात ? ते कश्याप्रकारे काम करतात ?
हे सगळे जाणून घेण्यासाठी प्राथ. शाळा केवणीदिवे येथील मुलांची क्षेत्रभेट या उपक्रमआन्तर्गत
कापड उदयोगास भेट देण्याचे ठरले.
आणी सकाळी सर्व विद्यार्थी व शिक्षक त्या कारखान्यांमध्ये गेले.
त्या ठिकाणी गेल्यानंतर कारखान्याचे व्यवस्थापक यांनी कारखान्यातील विविध मशीन व कामाची माहिती दिली.
या कारखान्यांमध्ये शर्ट कसे तयार केले जातात याची माहिती घेतली.
यामध्ये
एका वेळेस एका ताग्यामधून 250 ते 300 शर्ट चे कटिंग मशीन द्वारे केले जाते .
त्याच बेरोबर शर्टच्या विविध भागाचे म्हणजे बाही ,कॉलर यांचे ही कटिंग सेपरेट केले जाते.तसेच शर्ट कटिंगसाठी साईजनुसार बाही,शर्टचा पुढचा भाग,मागचा भाग,कॉलर इ भागाचे कटिंग होते व नंतर
मशीनवर ते शिवले जाते हे समजले.
तसेच हा पक्का माल तयार झाल्यानंतर तो बाजारपेठेत विक्रीला कसा नेला जातो व तो किरकोळ विक्रेत्याकडे कसा पोहचवला जातो हे देखील कंपनीच्या व्यवस्थापकानी मुलांना समजून सांगितले.
👇👇👇👇
या उपक्रमामुळे मुलांनी आपल्या मनात मनात असलेले विविध प्रश्न विचारून त्यांच्या शंकेचे समाधान करून घेतले.
या उपक्रमामुळे मुलांना मोठे उद्योग कश्या पद्धतीने चालतात हे समजले.
मोठ्या उद्योगांसाठी आवश्यक असणारे साहित्य म्हणजेच कच्चा माल कसा प्राप्त केला जातो हे समजले.
मोठ्या उद्योगासाठी लागणारी ऊर्जाकशी तयार केली जाते किंवा तिचा पुरवठा कसा केला जातो हे समजले.
ज्योती दिपक बेलवले.
प्राथ शाळा केवणीदिवे.
ता.भिवंडी ..जि. ठाणे.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मिंग्लिश वाक्य तयार करणे.
आज मुलांना मराठीत असे वाक्य तयार करण्यास सांगितले ज्यात एखादा इंग्रजी शब्द सर्रास आपण मराठीत देखील वापरतो असा शब्द प्रयोग असेल.
उदा. टेबल , इंजेक्शन, कलर, मशीन, पेन इ.
मी बेंचवर बसले.
I sat on bench.
मुलांनी वाक्ये तयार केल्यावर त्याच वाक्यांचे इंग्रजीत भाषांतर करण्यास सांगितले . मुलांनी वेगवेगळी वाक्ये तयार केली.
या भाषिक खेळाने...
मराठी आणी इंग्रजीचा सहसंबंध जोडून भाषिक विकास झाला .
कल्पनाशक्ती जागृत करुन मराठी व इंग्रजी वाक्यरचनेतील फरक मुले नकळत आनंददायी पद्धतीने शिकली.
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र
( ATM )
ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी ..जि.ठाणे.
म्हणींची अजब दुनिया
मुलांनी स्वतः तयार केलेल्या म्हणी..
आणि त्याचे स्पष्टीकरण
आज शिवजयंतीनिमित्त मुलांनी काढलेली रांगोळी ...मुलींनी स्वतः केलेले फलकलेखन...भाषणे...पोवाडे..नाट्य इ.
जि.प.शाळा केवणीदिवे .
Nice Activity mam kep it up.....
ReplyDeleteNice Activity mam kep it up.....
ReplyDelete