जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

आपल्या शाळेची वेबसाईड पहा.

आपल्या शाळेची वेबसाईड पहा *आपल्या शाळेचे संकेतस्थळ* https://education.maharashtra.gov.in/saral/*शाळेचा U-dise क्रमांक ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *मित्रहो, आपल्या शाळेचे संकेतस्थळ स्थळ तयार झालेले आहे* *जसे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे स्वतःचे संकेतस्थळ असते तसे अगदी पण मोफत* *चला तर मग जावूया आपल्या शाळेच्या संकेतस्थळावर www.education.maharashtra.gov.in *या साईट वर *School*पोर्टल वर click करा* *आपल्या समोर पाच विविध पोर्टल असणारी एक विंडो असेल त्याचा वरील भागात सातव्या क्रमांकाचे ऑप्शन आहे School Website त्याच्यावर click करा* *शाळेचा UDISE क्रमांक टाकून View school Website वर click करा, आपल्या समोर आपल्या शाळेचे संकेतस्थळ अथवा ज्या शाळेचे udise क्रमांक टाकू त्या शाळेचे संकेतस्थळ खुले होणार आहे* *सदर संकेतस्थळावर school पोर्टल वर जी माहिती भरली आहे ती सर्वांना पाहण्यासाठी खुली असणार आहे* *About us , our staff , Students Performance , Achievements , Photo Gallery ,Address , contact us , Feedback ,Notice board , Our moto , vision , School Report card* *आपण भरलेली school पोर्टल वरील सर्व माहिती , शाळेच्या बातम्या , आपले उपक्रम , विविध सभांचे इतिवृत्त , स्पर्धा परीक्षा उपक्रम* *वरील सर्व माहिती सर्वांना पाहता येणार आहे* *मग त्यासाठी शाळेचा वेगळा ब्लॉग, वेगळी website कशाला , आपल्या शाळेची विविध माहिती मोफत प्रसिद्ध करू शकतो* *मग आपली माहिती नेहमीच अपडेट असायला हवी त्यासाठी आपल्याला लॉगीन ची सोय सुद्धा त्याच पेज वर दिलेली आहे* *आपण पहिल्यांदा लॉगीन वर click करा* *आपल्या शाळेचा युजर id , पासवर्ड व captcha कोड टाकून लॉगीन करा , आपल्या समोर एकूण अठरा tab दिसतील ते अपडेट ठेवावे लागणार आहेत व जी माहिती भराल ती माहिती भरल्या नंतर submit बटनावर click करायचे आहे* ✅ *Home* *हा मुख्यपृष्ठ असणार आहे* ✅ *Notice Board* *ह्या मध्ये शालेय कामकाजा बद्दल विविध सूचना द्यायच्या आहेत* ✅ *Recent News* *आपल्या शाळेत जेजे Events झाले त्याची माहिती प्रसिद्ध करा. कोणत्या तारखे पर्यंत ती दिसली पाहिजे ते सेट करा . या शिवाय या बातम्यामध्ये विविध pdf files , फोटो सुद्धा प्रसिद्ध करू शकतो* ✅ *Quotes* *एखाद्याचे चांगले म्हणणे , चांगले वाक्य लिहा, त्याचे नाव लिहा , किती तारखे पर्यत ते दिसले पाहिजे ते सेट करा* ✅ *Activities for Society* *समाजसेवा उपक्रम लिहा, कोणत्या तारखेला हा उपक्रम राबविला ते लिहा. त्यासाठी आपण विविध फोटो , pdf files सुद्धा प्रसिद्ध करू शकतो* ✅ *Photos* *आपल्या शाळेत विविध कार्यक्रम , उपक्रम राबिवले जातात त्याचे आपण फोटो काढून प्रसिद्ध करू शकतो* *फोटोचे शीर्षक, फोटो कशा बाबतीत आहेत ते कोणत्या तारखे पर्यत दिसले पाहिजेत ते सेट करा. फोटो अपलोड करा* ✅ *Meeting Proceeding* *आपल्या शाळेत विविध समित्यांच्या बैठका होत असतात, आपण त्यांचे इतिवृत्त लिहितो तो येथे प्रसिद्ध करा. समितीचे नाव, सभेचा तपशील , सभेची तारीख , या संबधी pdf files व word files अपलोड करा* *शैक्षणिक वर्ष , कमिटीचे नाव , सभांची संख्या निवडून सभेचा सारांश लिहा* ✅ *Send SMS* *शालेय समितीची बैठक असेल किंवा विविध उपक्रम राबवायचे असतील त्या संबधी माहिती आपल्याला समितीच्या विविध सदस्यांना द्यायची असेल तर या मध्ये आपण समिती निवडा, SMS चा मजकूर type करा , submit वर click केल्यावर तो मेसेज सर्व समितीच्या सदस्यांना जाईल* *हे नावे व मोबईल क्रमांक आपण school पोर्टलवर माहिती भारतावेळी सेव केलेले असतात* ✅ *Prospectus* *आपल्या शाळेचे माहितीपत्रक येथे अपलोड करायचेआहे. माहितीपत्राकाचा तपशील , कोणत्या तारखे पर्यत वैध ते लिहायचे आहे* ✅ *Achievements* *आपल्या शाळेने काय काय साध्य, संपादन केलेले आहे त्याचा तपशील येथे नमूद करायचा आहे* ✅ *Vision and Mission* *आपल्या शाळेचे ध्येय नमूद करायचे आहे* ✅ *Exams* *School Exams* - *याच्या मध्ये शालेय परीक्षेचे वेळापत्रक, अभ्यासक्रम अपलोड करायचा आहे, परीक्षेचा प्रकार, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यत, इयत्ता हे नमूद करायचे आहे* *Competitive Exams* - *स्पर्धा परीक्षेचे नाव, कोण आयोजित करणार आहे, कोणत्या तारखे पासून कोणत्या तारखे पर्यत ते नमूद करावे* ✅ *Emergency Contact* – *दवाखाना, पोलीस स्टेशन, अग्निशमन दल , सल्लागार, रक्तपेढी यांचे आपत्कालीन फोन नंबर नमूद करायचे आहेत* ✅ *HM information* – *याच्या मध्ये शाळेचा लोगो, मुख्याध्यापकांचा फोटो , मुख्याध्यापक प्रोफाईल , संकेतस्थळ थीम रंग , संकेतस्थळ भाषा नमूद करायचे आहे* ✅ *Subject Thought* – *आपल्या शाळेत कोणकोणते विषय शिकवले जातात ते नमूद करा* *Time table* - *आपल्या शाळेचे इयत्ता व तुकडीनिहाय शिकवण्याच्या तासिकांचे वेळापत्रक भरायचे आहे* ✅ *Calender* - *याच्या मध्ये शालेय सुट्ट्यांची यादी भरावयाची आहे* ✅ *Photos* - *शालेय इमारत व क्रीडांगण याचे फोटो १ mb साईज पेक्षा कमी अपलोड करायचे आहे* *मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या शाळेचे संकेतस्थळ अपडेट करू शकतो व जगाला आपल्या शाळेची माहिती दाखवू शकतो* *ही माहिती आपण वेळोवेळी अपडेट करायला हवी* *आपल्या शाळेच्या संकेतस्थळाचा पत्ता खालीलप्रमाणे असेल* https://education.maharashtra.gov.in/saral/*शाळेचा U-dise क्रमांक

1 comment: