जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Face painting .





आज रंगपंचमी असल्याने जि.प.शाळा केवणीदिवे येथे चेहरे रंगवणे ( face painting ) हा उपक्रम घेतला.रंगवलेल्या चेहर्याने मुलांनी चेहर्यानुरुप अभिनय करुन दाखवला. निसर्ग माझा मित्र या विषयावर छोटेसे नाट्य सादर केले.दोन तिन चेहरे मी रंगवून दाखवल्यानंतर मुलांनीच आपल्या मित्रमैत्रिणींचे चेहरे रंगवून रंगपंचमीचा आनंद लुटला.

क्लासरूम थिएटर ही मुलांना स्व समृद्ध निर्भीड करण्यासाठी फार छान उपक्रम आहे.
क्लासरूम थिएटर साठी मुले स्वतः मेक करण्यास शिकल्यास पात्र अधिक रंगतदार होतात .मुलांनी निवडलेल्या पात्रात ते अधिक रुचीने काम करतात.आपले डायलॉग व वेशभूषा रंगभूषेमुळे मुले अधिक आत्मविश्वासाने  भूमिका रंगवतात.

सौ.ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे
ता - भिवंडी , जि- ठाणे.















































No comments:

Post a Comment