जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 5 January 2022

Talking textbook बोलणारी पाठय पुस्तके

*जागतिक दिव्यांग दिन आणि Talking textbook बोलणारी पाठयपुस्तके* *मिळून सारे ग्वाही देऊ,* *दिव्यांगांना सक्षम बनवू.* जागतिक दिव्यांग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला जातो. हा दिवस दिव्यांग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. आपण शिक्षक असल्यामुळे आपल्या सेवा कालावधीमध्ये काही विशेष गरजा संवर्गातील मुले आपल्या वर्गांमध्ये , शाळांमध्ये असतात. त्या मुलांसाठी वेगळ काही करता येईल का? असा विचार करून कोविड काळामध्ये तयार केलेलं हे *Talking textbook म्हणजेच बोलणारी पाठ्यपुस्तके* उपक्रम. *दिव्यांग मुलांसाठी विशेष करून ज्यांना दृष्टिदोष* आहे अशा मुलांचा विचार करून तयार केलेले हे podcast. हे दिव्यांग मुलांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये *इयत्ता पहिली ते चौथीतील मराठी आणि इंग्रजी विषयातील सर्व पाठ* समाविष्ट केलेले आहेत. यांचा वापर करून आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. हे इयत्ता पहिली ते चौथी चे पूर्ण पाठ Spotify व anchor या दोन्ही goole podcasts वर उपलब्ध आहेत. यावरील पाठ आपण download करून offline देखील वापरू शकतो. Talking textbook म्हणजेच बोलणारी पाठ्यपुस्तकांसाठी खालील लिंकला भेट द्या. For Spotify 👇 https://open.spotify.com/show/3DjDLel3ce4vv3UE30oxHo Talking textbook म्हणजेच बोलणारी पाठ्यपुस्तकांसाठी खालील लिंकला भेट द्या. For Anchor 👇 https://anchor.fm/jyoti-belawale *दिव्यांग मुलांना देखील सन्मानाचा, समानतेचा हक्क देऊया!!* *चला एक समतोल समाज घडवूया!!* सौ. ज्योती दीपक बेलवले. जि. प. शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र - सापगाव, ता - शहापूर, जि - ठाणे.

No comments:

Post a Comment