*चला नाचू, बोलू, लिहू*
सेतू अभ्यास - संभाषण, लेखन
*विषय - मराठी आणि कला*
*घटक - संभाषण, लेखन, अभिव्यक्ती, नृत्य*
उपघटक - माझा मित्र /माझी मैत्रीण
*Art Integrated Learning*
*Joyful learning*
*Happyness Class activity*
कृती - वर्गांमध्ये ब्लूटूथ स्पीकर वर बालगीत (मुलांच्या आवडीचे गीत घ्यावे. त्यांनाच विचारून ...अगदी झिंगाट किंवा पुष्पा देखील चालेल ) लावून त्यावर विद्यार्थ्यांना नृत्य करण्यास सांगितले. माझ्या मुलांनी "बागेत चला' या बालगीतांची फर्माईश केली. नृत्य करता करता जागा बदलायची सूचना दिली. हे करत असताना वर्गातील शंभर टक्के विद्यार्थी व शिक्षक सहभागी होतील याची काळजी घेतली. विद्यार्थ्यांना आधीच सूचना दिली होती की गाणे थांबल्यावर लगेच जोडी पकडायची आहे. जोडी करताना मुलगा-मुलगी असे बंधन ठेवले नाही. त्यानंतर आपल्या जोडीदाराला विविध प्रश्न विचारून आपल्या मित्र मैत्रिणी बद्दल अधिकची माहिती जाणून घ्यायची. आपल्या मित्रबद्दल जे ऐकले त्याचे आपल्या शब्दात लेखन करायचे.
सुरुवातीला मुले नृत्य करायला थोडी बिचकत होती. कारण जागेची देखील थोडी अडचण होती. नंतर काही वेळाने छान प्रकारे नृत्यात सहभागी होऊन , जोडी तयार करून, सक्रिय सहभाग घेऊन, एकमेकांना प्रश्न विचारून, त्यांनी आपल्या मित्राची अधिकची माहिती जाणून घेतली आणि त्याचे लेखन देखील केले.
भन्नाट activity ....
जबरदस्त विद्यार्थी प्रतिसाद ....
निखळ आनंद...
आणखी काय हवं..
आनंददायी शिक्षणासाठी 🙏
सौ ज्योती दीपक बेलवले
जि प शाळा दोऱ्याचापाडा
केंद्र सापगाव , तालुका शहापूर
जिल्हा ठाणे.
No comments:
Post a Comment