जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 5 January 2022

आजादी का अमृत महोत्सव रांगोळी स्पर्धा

*समग्र शिक्षा पं. स. शहापूर आयोजित स्वातंत्राचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वतंत्र भारत या विषयावर रांगोळी स्पर्धा* दि. २१ डिसेंबर २०२१ जि. प. प्राथमिक शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र सापगाव, ता शहापूर, जि ठाणे तेथील विद्यार्थ्यांनी मधल्या सुट्टीत स्वतंत्र भारत या विषयावर सुरेख रांगोळ्या रेखाटल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात दिनांक १२ मार्च २०२१ पासून पुढील ७५ आठवडे राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने घेतलेला हा उपक्रम. स्वाभिमान आणि स्वातंत्र्यानंतर आता देश सातत्याने स्वावलंबनाच्या मार्गावर पुढे जात आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू झालेला ‘आझादी का अमृत महोत्सव’ हे स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, जे १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरे करायचे आहे. चला तर मग... *स्वातंत्राचा अमृत महोत्सव साजरा करूया,* *संकल्प देश स्वाभिमानाचा आणि आत्मनिर्भर भारत घडवूया.....!!* #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव #आझादीकाअमृतमहोत्सव #आत्मनिर्भरभारत #AmritMahotsavofIndependence #जिल्हापरिषद_ठाणे #thanerural #ठाणे_ग्रामीण #जिल्हापरिषद #Thane #स्वातंत्र्याचा_अमृत_महोत्सव सौ. ज्योती दीपक बेलवले. जि. प. शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र - सापगाव,ता - शहापूर, जि - ठाणे.

No comments:

Post a Comment