जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 5 January 2022

निपुण भारत अभियान रांगोळी व चित्रकला स्पर्धा

*SCERT महाराष्ट्र आयोजित निपुण भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितोत्सव उपक्रमांतर्गत जि. प. शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र- सापगाव, ता- शहापूर, जि- ठाणे* शाळेतील मुलांनी गणितावर आधारित चित्रकला आणि रांगोळी रेखाटन केले. सुप्रसिद्ध महान गणितज्ञ,गणिताचे जादूगर श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून दर वर्षी २२ डिसेंबर रोजी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने घेतलेला हा उपक्रम. गणिताशी संगत, आणि शिक्षणात रंगत या उक्तीप्रमाणे मुलांनी *गणितातील विविध चिन्हे, क्रिया, विविध आकार, त्रिकोण, चौकोनाचे प्रकार, चित्र रूप समीकरण, आलेख, घनाकृती, सममिती अक्ष यांसारख्या संकल्पना स्पष्ट करणाऱ्या रांगोळी काढल्या.* काही विद्यार्थ्यांनी गणितावर आधारित चित्रांचे रेखाटन केले. यात *घातांक, भौमितिक आकार , गणिती परिमाणे* इ. घटकांच्या अनुषंगाने चित्र रेखाटन केले. आनंददायी शिक्षणाद्वारे गणित विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी वरील उपक्रम परिणामकारक आहेत. सुलभकाची भूमिका योग्य प्रकारे पार पडली की विद्यार्थी अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद देतात. याचा पुन्हा एकदा अनुभव आला. , #Mathematicsday2021 #Ganitotsav2021 #Nipunbharatabhiyan #FLN #जिल्हापरिषद_ठाणे #thanerural #ठाणे_ग्रामीण #जिल्हापरिषद #Thane सौ. ज्योती दीपक बेलवले. जि. प. शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र - सापगाव, ता - शहापूर, जि - ठाणे.

No comments:

Post a Comment