जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 5 January 2022

हत्तीरोग संक्रमण पडताळणी

*जि. प. शाळा दोऱ्याचापाडा येथे राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम - हत्तीरोग संक्रमण पडताळणी कार्यक्रम संपन्न* 5 ऑक्टोबर 2021 जि प प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा येथे हत्तीरोग संक्रमण पडताळणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी खालील मान्यवर उपस्थित होते. *डॉ. रुपाली शेंडगे, वैद्यकीय अधिकारी शेंद्रून* *डॉ. योगिनी निरवारे, C.H.O आवाळे* *डॉ. झुल्फिकार खान C.H.O हीव* *महाजन साहेब तालुका पर्यवेक्षक हिवताप शहापूर* *आरोग्य सहाय्यक घरत वासिंद, लॅब टेक्निशन वराट साहेब वासिंद, MPW दीपक विशे, सुनील पवार, निलेश वेखंडे, खांबायत, राज चौधरी, आशा ताई* इ मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात शाळेतील 6 ते 8 वयोगट सर्व विद्यार्थ्यांची Community T.A.S समुदाय संक्रमण पडताळणी करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांची RD Kit द्वारे रक्त तपासणी करण्यात आली व पडताळणी करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पवार आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. *लवकर निदान लवकर उपचार* *हत्तीरोग होईल पसार* रोगाचा प्रकार किटकजन्‍य रोग नैसर्गिक इतिहास माणसांमध्‍ये लसिकाग्रंथिंच्‍या हत्‍तीरोगाचा प्रादुर्भाव गत ४००० वर्षापासून होत असावा,असे दिसून येते. सन १८६६ मध्‍ये लेविस, डिमार्क्यू आणि विचेरिया यांनी मायक्रोफायलेरिया व हत्‍तीरोगाचा परस्‍पर संबध असल्‍याचे स्पष्ट केले. सन १८७६ मध्‍ये जोसेफ बॅनक्रॉप्‍टी यांनी हत्‍तीरोगाचा पूर्ण वाढ झालेला जंतू शोधला. हत्तीरोग जंतूच्या जीवन चक्रासंदर्भात पॅटेट्रीक मॅन्‍सन आणि जॉर्ज कॉर्मिसेल यांचे संशोधन ही मोलाचे आहे. रोगकारक घटक हत्‍तीरोगाचा प्रसार सुतासारखा दिसणा-या परोपजीवी कृमींमुळे होतो. भारतामध्‍ये ९८ टकके रुग्‍णांमध्‍ये हत्‍तीरोगाचा प्रसार बुचेरिया बॅनक्रॉप्‍टी या परोपजीवी कृमींमुळे झालेला आढळून येतो. भारतातील २५० जिल्‍हयांमध्‍ये स्‍थानिक स्‍वरुपात लागण झालेल्‍या हत्‍तीरोग रुग्‍णांची नोंद आहे. प्रौढ अवस्‍थेमध्‍ये हत्‍तीरोगाचे जंतू लसीका संस्‍थेच्‍या वाहिन्‍यांमध्‍ये राहतात.लसीका संस्‍था ही लसीका ग्रंथी आणि लसीका वाहिन्‍यांची बनलेली यंत्रणा असून ती शरीरातील रोगप्रतिकार शक्‍ती अबाधित ठेवण्याचे कार्य करते. रोगकारक घटक मनुष्‍यांमध्‍ये फार पुर्वीपासून हत्‍तीरोगाचे जंतू आढळून येतात. वय – सर्व वयोगटांमध्‍ये हत्‍तीरोगाची लागण होऊ शकते. लिंग – स्‍त्री किंवा पुरुष दोघांना हत्‍तीरोग होऊ शकतो. मात्र हत्‍तीरोगाचा प्रादुर्भाव असणा-या क्षेत्रात पुरुषांमध्‍ये हत्‍तीरोगाचे प्रमाण जास्‍त दिसून येते. स्‍थलांतरीत लोकसंख्‍या – काम व इतर कारणांमुळे वारंवार स्‍थलांतर करणा-या लोकांमुळे एका भागातून दुस-या भागात हत्‍तीरोगाचा प्रसार होतो. रोगप्रतिकार शक्‍ती – हत्तीचरोगाच्या रोगप्रतिकार शक्‍तीबाबत अदयाप निश्चित माहिती उपलब्‍ध नाही. सामाजिक कारणे – वाढते शहरीकरण, औदयोगिकीकरण, लोकांचे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी होणारे स्‍थलांतर,अज्ञान , गरीबी आणि अस्‍वच्‍छता पर्यावरणीय घटक वातावरण- २२ ते ३८ डिग्री सेंटीग्रेड तापमान आणि ७० टक्‍के आर्द्रता ही क्‍युलेक्‍स डासांच्‍या वाढीसाठी पोषक असते. क्युलेक्सख डासांची उत्पात्तीत घाण, प्रदुषित पाण्याोत खूप मोठया प्रमाणात होते. अयोग्यण पध्दोतीची गटारे, शहरांचे व गावांचे अयोग्य आणि अपुर्ण नियोजन, सांडपाण्याचा अयोग्यं पध्दरतीने होणारा निचरा या सर्व बाबींमुळे क्यु्लेक्सप डासांची उत्पपत्तीा खूप मोठया प्रमाणात होते आणि त्यागमुळे हत्तीवरोगाचा प्रसार व प्रादुर्भाव वाढतो. रोगप्रसाराचे माध्‍यम दुषित डास चावल्‍यामुळे हत्‍तीरोगाचा प्रसार होतो. (क्‍युलेक्‍स प्रकारचे डास बुचेरेरिया बॅनक्रॉप्‍टीया हत्‍तीरोगाच्‍या परोपजीवी जंतूचा प्रसार करतात.) दुषित डास मनुष्‍याला चावा घेतेवेळी त्‍या ठिकाणी हत्‍तीरोगाचे जंतू सोडतो. हा जंतू त्‍या ठिकाणाहून किंवा अन्‍य ठिकाणाहून त्‍वचेतून शरीरात प्रवेश मिळवितो आणि लसीका संस्‍थेमध्‍ये जातो. अधिशयन काळ हत्‍तीरोगाच्‍या संसर्गजन्‍य जंतूच्‍या शरीरातील प्रवेश आणि मायक्रोफायलेरिया रक्‍तात सापडणे. या कालावधी विषयी निश्चित माहिती उपलब्‍ध नाही तथापि, हत्‍तीरोगाच्‍या संसर्गक्षम जंतूचा शरीरातील प्रवेश आणि आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा ८ ते १६ महिन्‍यांचा असतो. लक्षणे व चिन्हे रोग लक्षणाच्या ४ अवस्‍था असतात. जंतू शिरकावाची अवस्‍था- यामध्‍ये आजाराबाबत लक्षणे दिसू शकतात. लक्षणविरहीत अवस्‍था / वाहक अवस्‍था – यामध्‍ये रुग्‍णांचा रात्रीच्या रक्‍तनमूना तपासणीत मायक्रो फायलेरिया (mf) आढळून येतात मात्र रुग्‍णांमध्‍ये रोगाची कोणतीही लक्षणे व चिन्‍हे आढळून येत नाहीत. तीव्र लक्षण अवस्‍था- या अवस्‍थेमध्‍ये ताप, लसीकाग्रंथीचा दाह, लसीकाग्रंथीना सूज तसेच पुरुषांमध्‍ये वृषणदाह इ. लक्षणे दिसून येतात. दिर्घकालीन संसर्ग अवस्‍था- या अवस्‍थेमध्‍ये हात, पाय व बाहय जननेंद्रियावर सूज, अंडवृध्‍दी इ. लक्षणे दिसतात. निदान हतीरोग जंतूच्या विशिष्ट सवयीमुळे हे जंतू मानवी रक्तात रात्री मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे रात्री ८.३० ते १२ दरम्‍यान रक्‍तनमूना घेऊन तपासणी केल्‍यानंतर हत्‍तीरोगाचे निदान करता येते. औषधोपचार ज्‍या रुग्‍णांमध्‍ये मायक्रो फायलेरिया आढळून येतात. अशा रुग्‍णांना डीईसी (डायइथील कारबामाझाईन) या गोळया ६ मिलिग्रॅम प्रतिकिलो शरीराचे वजन (प्रौढ व्यक्‍ती ३०० मिलीग्रॅम ) या प्रमाणात १२ दिवस देण्‍यात येतात. रुग्‍णांने पायाची स्‍वच्‍छता करणे आणि काळजी घेणे तसेच शारीरिक व्‍यायाम करणे हे महत्‍वाचे असते (विकृती व्‍यवस्‍थापन ) हत्‍तीरोगाची तीव्र लक्षणांसाठी वैद्यकीय सल्ल्याने योग्‍य उपचार घेणे आवश्‍यक असते. प्रतिबंधात्‍मक आणि नियंत्रणात्‍मक उपाययोजना हत्‍तीरोग नियंत्रणात प्रतिबंधात्‍मक उपाययोजना महत्‍वाच्‍या आहेत. अ )डासांचे नियंत्रण डासांचे अळी अवस्‍थेत नियंत्रण करण्‍यासाठी - किरकोळ अभियांत्रिकी उपाययोजनाव्‍दारे डास उत्‍पत्‍ती स्‍थाने कमी करणे महत्‍वाचे आहे. मैला, घाण, कचरा इत्‍यादीची योग्‍य पध्‍दतीने विल्‍हेवाट लावणे. खड्डे, सखल जागा मातीचा भराव टाकून बुजविणे. साचलेल्‍या पाण्‍यातील पाणवनस्‍पती,गवत इत्‍यादी काढून टाकणे, डास उत्‍पत्‍ती स्‍थानांमध्‍ये मलेरिया ऑईल, पॅरीसग्रीन अथवा किटकनाशकाची फवारणी करणे, डासांचे प्रौढ अवस्‍थेत नियंत्रण करण्‍यासाठी– किटकनाशकांची फवारणी करणे. डासांच्‍या चावण्‍यापासून रोगक्षम व्‍यक्तिचे संरक्षण करणे. आरोग्‍य शिक्षण- जनतेमध्‍ये पुढील मुददयाबाबत जागृती होणे महत्‍वाचे आहे. मैला, घाण, कचरा इत्‍यादीची योग्‍य पध्‍दतीने विल्‍हेवाट लावणे. सांडपाण्‍याचा योग्‍य पध्‍दतीने निचरा करणे. मच्‍छरदाण्‍यांचा वापर करणे, घराच्‍या दारे, खिडक्‍यांना डास प्रतिबंधक जाळी बसविणे. हत्‍तीरोगासाठी रात्रकालीन रक्‍तनमूना संकलनासाठी सहकार्य करणे. ब ) रोगाचे सर्वेक्षण क)एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार हत्‍तीरोगाचा प्रसार रोखण्‍यासाठी हत्‍तीरोग समस्‍याग्रस्‍त लोकसंख्‍येमध्‍ये २ वर्षाखालील मुले,गर्भवती स्ञिया व गंभीर आजारी रुग्‍णांना वगळून सर्वाना वर्षातून एकदा एकाच वेळी डीईसी गोळया खाऊ घालणे महत्‍वाचे आहे. ही मोहिम किमान पाच वर्षे राबविल्यास हत्‍तीरोगाचे दुरीकरण होण्यास हातभार लागू शकतो. आरोग्‍य शिक्षण संदेश लसीकाग्रंथीच्‍या हत्‍तीरोगासाठी वैयक्तिक स्‍वच्‍छता आणि हत्‍तीपायाच्‍या सूजेवरील उपचार. हत्‍तीपाय असणा-या रुग्‍णांनी तीव्र लक्षण अवस्‍था टाळण्यासाठी पायांची किंवा बाधित अवयवांची साबण व पाण्‍याने नियमित स्‍वच्‍छता ठेवावी. पायाच्‍या आकारमानाप्रमाणे योग्‍य पादञाणे वापरावीत. पायाला जखम होऊ नये म्‍हणून काळजी घ्‍यावी. हत्‍तीरोगामुळे आलेल्‍या अंडवृध्‍दीसाठी शस्‍ञक्रिया करुन घ्यावी. एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम व राञकालीन रक्‍तनमूना तपासणीत सहभाग घ्‍यावा. रक्‍तनमूना तपासून घेऊन उपचार घ्‍यावा. डासांची उत्‍पत्‍ती रोखण्‍यासाठी डास उत्‍पत्‍ती स्‍थानांच्‍या ठिकाणी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना राबवाव्‍यात. रोगाचा संसर्ग रोखण्‍यासाठी आणि डासांचे जीवनचक्र ख्ंडीत करण्‍यासाठी साचलेल्‍या पाण्‍यात गप्‍पीमासे सोडावेत. पाण्‍याच्‍या टाक्‍या, रांजण, बॅरल, हौद यांना व्‍यवस्थित झाकणे बसवावीत. कापडाने झाकावीत, वेळोवेळी त्‍यांची स्‍वच्‍छता करावी. आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस म्‍हणून पाळावा. माहिती स्रोत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग सौ. ज्योती दीपक बेलवले. जि. प. शाळा दोऱ्याचापाडा,
केंद्र सापगाव, ता शहापूर, जि ठाणे

No comments:

Post a Comment