जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 5 January 2022

गायत्री आनंदी दात्री कडून शाळेस टीव्ही भेट

*सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नवदुर्गा..* *मुलांसाठी अनोखी भेट अनोख्या पद्धतीने* दिनांक 26 ऑगस्ट रोजी एक मेल माझ्या मेल आय डी वर येतो..मेल वर संदेश असतो.. नमस्ते मॅडम मी स्नहेल कठारे. मला तुमचा संदर्भ FB वरून मिळाला. आम्हा ४ मैत्रिणींचा मिळून गायत्री....आनंद दात्री" नावाचा सामाजिक उपक्रम आहे. त्याअंतर्गत आम्ही शिक्षण क्षेत्रात काही योगदान करू इच्छित आहोत. "तुमच्या शाळेअंतर्गत अशी कोणी गरजू मुले असतील तर कृपया मला दिलेल्या ईमेलवर संपर्क करा. मी तुम्हाला मेसेज देखील पाठवला आहे. वरील संदेश वाचून मी ही मेलला प्रतिउत्तर दिले....सुरुवातीला एक विशेष वाटले की सोशल मीडियावरील शाळेचे उपक्रम पाहून कोणीतरी शाळेला मदत करू इच्छित आहे. मनोमन खूप आनंद झाला कारण आपण करत असलेल्या कामाची दखल *गायत्री आनंद दात्री टीम* ने स्वतःहून घेतली, ज्यांना आपण कधी भेटलेलो नाही, पाहिलेलं नाही, बोललेलं नाही अशी संस्था फक्त काम पाहून मदतीचे आवाहन करते याचे आश्चर्य वाटले. तशी दोऱ्याचापाडा ही शाळा शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी असलेली शाळा...या शाळेत आम्ही 5 जणी आमच्या परीने आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करत होतोच. शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय प्रगती करतोय..त्यातच ही सुखद बातमी मिळाली होती. कोविड काळात मुलांच्या शिक्षणाची ससेहोलपट होत होती. त्यातच एक आशेचा किरण *गायत्री..आनंद दात्री* च्या रूपाने दिसला होता. मी देखील नंतर स्नेहलताई कठारे यांना मेलद्वारे शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची मागणी केली...स्नेहलताईचा फोन आला आमची संस्था लहान आहे एवढी मोठी मदत आम्ही करू शकत नाही ...नंतर मी ही थोडे नाराज झाले कारण मी मागणी केली होती ती labtop, टॅबस, अँड्रॉईड मोबाईलची ..कारण आमचे सर्व पालक हे मोलमजुरी करून आपली गुजराण करणारे.. कोरोना काळात शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यास या सर्व डिजिटल साहित्याची मदत होणार होती. ताईंचा संदेश आला मन थोडे नाराज झाले. कारण ताई शालोपयोगी साहित्य देणार होत्या मी त्यांना नकार दिला. माझ्या शाळेस काही संस्थांनी शालोपयोगी साहित्य दिले होते त्यामुळे एखाद्या गरजू शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा हा माझा हेतू होता.माझ्या शाळेची ही गरज भागली होती. पण म्हणतात ना.. जे होते ते चांगल्यासाठी. स्नेहलताई कठारे यांचा मागच्या आठवड्यात पुन्हा message आला. फोनवर चर्चा करत असताना मी त्यांना स्मार्ट tv ची मागणी केली. त्यांनी मला स्मार्ट tv चा उपयोग शालेय शिक्षणात कसा करतात याबद्दल माहिती विचारली. मी सविस्तर माहिती दिली. त्यांना ते खूप आवडले. Without Internet mobile tv ला जोडून करत असलेले प्रयोग त्यांना आवडले. त्या स्मार्ट tv देण्यास तयार झाल्या आणि मी क्षणाचाही विलंब न लावता हो म्हंटले..(कारण नुकत्याच 5वी ते 8 वीच्या वर्गाच्या शाळा सुरू झाल्या होत्या.. या TV चा वापर नक्कीच होणार होता) हो म्हटलं आणि ताईंनी TV पाठवून देणेसाठी पत्ता मागवला. घटस्थापनेच्या दिवशी amazon वर शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पवार यांच्या पत्त्यावर ऑर्डर दिली. काल TV प्राप्त झाला. आज शाळेत नेला. मुलांना खूप आनंद झाला. आजच्या धावपळीच्या युगामध्ये कोण कोणासाठी साधा reply ही देत नाही तिथे... *सुष्मिता भिवंदे,* *पल्लवी जंगम,* *शिल्पा पाटकर,* *स्नेहल कठारे* या नवदुर्गांनी सुरू केलेल्या *गायत्री..आनंद दात्री फाऊंडेशन* सारखी संस्था स्वतः समाजातील गरजवंतांचा शोध घेऊन मदत करते ही सर्वांसाठी दिशादर्शक व प्रेरणादायी अशी बाब आहे. एखादी वस्तू किती मोठी किंवा किती छोटी याचे मूल्य परिस्थिती, वेळ, गरज यावर अवलंबून असते. मला याची खूप गरज होती. या smart tv चा वापर आम्ही नक्कीच smart पणे करणार. जि प शाळा दोऱ्याचापाडा शाळेतील विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांचेकडून मनःपूर्वक धन्यवाद टीम *गायत्री..आनंद दात्री फाऊंडेशन* सौ. ज्योती दीपक बेलवले. जि. प. शाळा दोऱ्याचापाडा. केंद्र- सापगाव, ता - शहापूर, जि - ठाणे.

No comments:

Post a Comment