जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday, 5 January 2022

समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत लुई ब्रेल जयंती*

*समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत लुई ब्रेल जयंती* #जिल्हापरिषद_ठाणे #thanerural #ठाणे_ग्रामीण #जिल्हापरिषद #Thane शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे... पण दृष्टिहीन व्यक्तींना मात्र त्यासाठी ‘न भुतो न भविष्यती’ असा संघर्ष करावा लागला आहे. अंध व्यक्तींनी खूप पूर्वीच स्वीकारलेली तरीही शोध लागल्यानंतर शंभर वर्षांनी मान्यता मिळालेली 'सहा टिंबांची लिपी' अर्थात *ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांची जयंती जि. प. शाळा दोऱ्याचापाडा, तालुका शहापूर जिल्हा ठाणे* येथे साजरी करण्यात आली .लुई ब्रेल यांचा जन्मदिवस जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो . वृद्धापकाळामुळे हळूहळू दृष्टी गमावणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठीही ही लिपी संजीवनीचं काम करते. विद्यार्थ्यांना लुई ब्रेल यांची माहिती सांगून *त्यांचे बालपण, त्यांना आलेले अंधत्व, त्यावर त्यांनी केलेली मात त्यांचे शिक्षण, त्यांचे संशोधन आणि ब्रेल लिपीचा शोध त्यांनी कसा लावला यावर आधारित एक चित्रफित* दाखवण्यात आली. हे दाखवत असतानाच विद्यार्थ्यांनी डोळस निरीक्षण करणे, विचार करणे व त्यातून नवीन काही निर्माण ( संशोधन ) करता येईल का? याबाबत ची दृष्टी विकसित करण्यात आली. *डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका* *जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका.* या गीताचे गायन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सौ. ज्योती दीपक बेलवले. जि. प. शाळा दोऱ्याचापाडा, ता - शहापूर, जि - ठाणे.

No comments:

Post a Comment