जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 5 January 2022

बालिका दिन

#balikadin2022, #misavitri2022, #mahilashikshandin2022 #ज्ञानज्योती #सामाजिक_क्रांतीच्या_आद्य_प्रणेत्या #मायसावित्री #स्त्रीशिक्षणाच्याप्रणेत्या #आजच्याटेक्नोसेव्हीसावित्रीचाप्रवास #जिल्हापरिषद_ठाणे #thanerural #ठाणे_ग्रामीण #जिल्हापरिषद #Thane *जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा* *॥नतमस्तक ॥* *ज्योत लावलीस तू सावू ,वणवा मी पेटवीनं,* *तुझं शिल्प कोरलेलं,ते बोलकं मी करीनं।।* *आलेल्या संकटांशी, निर्भीड मी लढेन,* *प्रामाणिकता जपून, सदोदित कार्य मी करीन।।* जि. प. शाळा दोऱ्याचा पाडा, ता शहापूर, जि ठाणे येथे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राचा लेकीचा या कार्यक्रमाची सुरुवात उत्साहात करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरा करताना शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील अनेक विद्यार्थिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, जिजामाता इ. च्या वेशभूषेमध्ये उपस्थित होत्या. शिक्षिकांनी आणि विद्यार्थिनींनी सावित्रीबाई यांच्या जीवन कार्यावर उस्फुर्त भाषणे, गीते, ओव्यांचे गायन करून फेर घरला. सद्यस्थितीत मुलींचे शिक्षण, मुलींकडे असणाऱ्या संधी, जबाबदाऱ्या इ. बाबींवर मार्गदर्शन केले. सौ. ज्योती दीपक बेलवले. जि. प. शाळा दोऱ्याचापाडा, ता - शहापूर, जि - ठाणे.

No comments:

Post a Comment