जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 5 January 2022

अनोखी दिवाळी भेट

Late post🙏 *अनोखी दिवाळी भेट* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोऱ्याचापाडा म्हणजे 100% आदिवासी बहुल विद्यार्थी असलेली शाळा.. कोरोना काळात देशभरातील विद्यार्थी अभ्यासात मागे पडले आहेत हे सांगण्याची गरज नाही. माझ्याही शाळेतील बरेच विद्यार्थी मूलभूत क्रिया विसरले आहे असे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी सतीश भोंग यांची 60 दिवसात वाचन लेखन, झटपट वाचन लेखन,जोडाक्षरांच्या सरावासाठी विद्यार्थी मित्र यावर आधारित पोस्ट वाचली होती. सतीश भाऊंशी संपर्क केला व शाळेतील विद्यार्थ्यांचे वाचन लेखन व सरावासाठी ही पुस्तके कशी मिळतील याविषयी विचारणा केली. सतिषभाऊंनी पुस्तकाच्या मांडणीबद्दल माहिती सांगितली आणि पत्ता मागवला. काही दिवसांपूर्वी पुस्तके मिळाली. सर्व पुस्तके अप्रतिम तयार केली आहेत. पुस्तकांचे पैसे किती पाठवायचे अशी विचारणा केली असता सतिषभाऊ म्हणाले की, "माझ्यातर्फे दोऱ्याचापाडा शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी भेट आहे. पैसे नकोत." सर्व पुस्तकांची अप्रतिम अशी मांडणी केलेली आहे. माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीची अनोखी भेट दिल्याबद्दल श्रेयशी प्रकाशनच्या संचालिका अश्विनीताई भोंग व सतिषभाऊ भोंग यांचे दोऱ्याचापाडा शाळेतील विद्यार्थी व पालक यांच्यातर्फे मनस्वी धन्यवाद.. पुस्तके पाहिल्यानंतर असे वाटले की महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये ही पुस्तके असायला हवीत. इतकी सुंदर आणि सोप्या पद्धतीने पुस्तकांची मांडणी केलेली आहे. नक्कीच या पुस्तकांचा वापर केल्यास कोणताही विद्यार्थी लवकर वाचू लिहू शकतो. पुन्हा एकदा श्रेयशी प्रकाशन व भोंग परिवाराचे मनस्वी धन्यवाद..🙏🙏 सौ. ज्योती दीपक बेलवले. जि. प. शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र सापगाव, ता शहापूर, जि ठाणे

No comments:

Post a Comment