जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 23 August 2016

 आजचा उपक्रम...शब्द परडी

सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे.
ता.भिवंडी...जि.ठाणे

साहित्य ..सुकलेल्या बुकेच्या परड्या , टिंटेड पेपर,बांबूच्या काड्या, फेविकाँल, सेलो टेप इ.

कृती - टिंटेड पेपरचे वेगवेगळे आकार प्रत्येक परडीसाठी कापून घेतले.फूले, हात,सफरचंद ,चौरस,वर्तुळ इ. आकार कापून घेतले. त्या आकारांवर वाक्यप्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, Action words, relative words,rhythming words , सारख्या अक्षराने सुरु होणारे शब्द जसे मराठीत -अजगर,अननस......हिंदीत-आम,आसमान...इंग्रजीत- cat,catch..., सारख्या अक्षराने शेवट होणारे शब्द मराठीत - गळा,मळा  हिंदीत-आम,नाम  इंग्रजीत- pay,say..इ.प्रकाराचे शब्द लिहून बांबूच्या काड्यांवर एक एक आकार चिटकवून परडीतील स्पंजवर लावले. प्रत्येक परडीला योग्य समर्पक नाव दिले.झाली शब्द परडी तयाsssssर....

टाकाऊतुन उपयुक्त असे साहित्य तयार होते.कलात्मकतेचा विकास होऊन वर्ग सुशोभनासाठी हटके ...आकर्षक ...नाविन्यपूर्ण साहित्य म्हणजे शब्द परडी होय.


सौ.ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी ...जि.ठाणे .









No comments:

Post a Comment