जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Monday, 14 March 2016

गणिती अँप

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

🖥 तंत्रज्ञानाची रंजक दुनिया 🖥

नमस्कार सर्वाना,
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्वच विषय सुलभ पद्धतीने कशा प्रकारे शिकविता येतात अस म्हणण्यापेक्षा मूल कशी शिकतात हे आपण काही अँप्स स्वरूपात पाहिलं.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्राथमिक स्तरावर गणित विषयांतर्गत मूलभूत क्रियांवर खूप भर दिलेला आपल्याला आढळून येतो.
दैनंदिन व्यवहारात गणिताशिवाय पर्यायच नाही अस म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
प्राथमिक स्तरावर गणित विषयाची नावड दूर करून आवड लावण्यासाठी आज मी काही अँप्स आपणासमोर ठेवणार आहे. आमच्या शाळेत मूल या अँप्सच्या साहाय्याने हसतखेळत गणित उदाहरणे सोडवित असतात.
गणितविषयक आवड या अँप्स माध्यमातूनच मुलांना लागली.मूल या अँप्स चा वापर करायला लागल्यापासून त्यांची तर्कशक्ती वाढल्याचे दिसून आले.वेगाने गणित करण्याची क्षमता देखील विकसित झाली.
फळ्यावर गणित द्यायचे.. ते मुलांनी सोडवायचे.. ते आपण तपासायचे ही पारंपरिक पद्धत आता बाजूला ठेवूत. या तंत्रज्ञानाच्या युगात या अँप्स चा वापर करून रंजकता आपणास आणता येईल.

आपल्याला देखील गणित विषयाची आवड मुलांना लावण्यासाठी या अँप्स चा उपयोग होऊ शकतो. खाली या अँप्सच्या लिंक व अँप्स नाव शेयर करत आहे.
Google play Store वर हे अँप्स निशुल्क स्वरूपात उपलब्ध आहेत.

➡ MATHTETRIS LITE

market.android.com/details?id=com.kidsworldapps.mathtetrislite

➡MATH BALOON

market.android.com/details?id=com.kidsworldapps.mathballoonsadfree

➡MULTIPLICATION GENIOUS

market.android.com/details?id=com.kidsworldapps.multiplicationgeniusadfree

सर्वांनी हे अँप्स डाउनलोड करून वापर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

धन्यवाद..!🙏🙏🙏


       ✍ सौ.ज्योती बेलवले        जि.प.शाळा केवणीदिवे..भिवंडी
               जिल्हा परिषद
                     ठाणे
    कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)

💻💽💾🖥📺📠🎙📻🖨📲

No comments:

Post a Comment