जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Thursday, 10 March 2016

इंग्रजी साठी अँप

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
नमस्कार सर्वांना,
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच शाळा डिजिटल होत असताना आपण पाहतो. शाळेत तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती करता येते हे आपण सर्वजण जाणतो. त्याला इंग्रजी हा विषय पण अपवाद नाही.

आज इंग्रजी भाषा ही जागतिक ज्ञानभाषा म्हणून ओळखली जाते. या भाषेची मुलांना आवड लागावी म्हणून आपण शाळेत विविध उपक्रम राबवत असतो. जसे शब्द पाठांतर, हजेरीला इंग्रजी शब्द सांगणे इ.
शब्द पाठांतर खेळातून झाले तर...शब्द पाठांतरावर आधारित अँप्स शोधले.याचाच मी शाळेत वापर केला.शब्द पाठांतर न करणारी मूल आवडीने शब्द पाठांतर करू लागली.

खरंच खेळातून शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने... मुलांना फार आवडले.
आपल्याला कधी काम असलं की मूल स्वतःहून हा खेळ खेळतात. या अँप्स मुळे मुलांची शब्दसंपत्ती वाढताना मला आढळून आली. समानार्थी व विरुद्धार्थी शब्दसंग्रह पण वाढला.

त्या अँप्स च्या डायरेक्ट डाउनलोड लिंक👇👇👇👇👇

🔹Opposite words match memory game

market.android.com/details?id=com.educren.oppositewords.memorymatchgame.free

🔹Spelling for children

market.android.com/details?id=vn.sieuweb.tamngon3

हे अँप्स डाउनलोड व त्याचा वापर करून तुम्ही मुलांची इंग्रजी शब्दसंपदा वाढवू शकता त्याचप्रमाणे विषयाची भीती दूर करू शकता.

धन्यवाद..!🙏🙏🙏

      ✍  सौ. ज्योती बेलवले  ✍
                     ठाणे
    कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

No comments:

Post a Comment