महिला दिन....
आज जागतिक महिला दिन..
यानिमित्ताने संपुर्ण सोशल मिडियावर महिला दिनाच्या शुभेच्छा पहायला मिळाल्या.एक प्रकारे आनंदच झाला. पण या शुभेच्छा ,
मोठं मोठ्या लोकांनी दिलेल्या शुभकामना,
स्वतःला महिलांचे पालनकर्ते समजणारे लोकांच्या पेपरात मोठमोठ्या बातम्या वाचल्या... यातील काहीजण नक्कीच महिला सबलीकरणासाठी काम करत आहेत याबद्दल दुमत नाही पण सगळेच बोलतात तसं वागतात अस नाही.
तसे खरे पाहता 8 मार्च या दिनी न्यूयार्क येथे महिलांनी अन्यायाविरुद्ध आंदोलन केले होते आणि याच दिनास नंतर महिला दिन म्हणून घोषित करण्यात आले.
भारतामध्ये सर्वात प्रथम मुंबई येथे 8 मार्च 1943 ला पहिला महिला दिन साजरा केला.
आज या दिनी सर्वजण महिलांबद्दल प्रेम ,करुणा दाखवताना दिसत आहेत.. कदाचित दररोज दाखवणारे ही आहेत .
पण या दिनानिमित्त महिला सबलीकरणासाठी सर्वानी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून वागले पाहिजे प्रत्येक जण स्त्रीयांच्या शिक्षणाबद्दल बोलत आहे.....
त्यांच्या आताच्या परिस्थितीबद्दल बोलत आहे...
मोठं मोठ्या मासिकातून पेपरमधून लिहित आहे....
पण
ज्यावेळी त्यांच्यावर ती आचरणाची वेळ येते तेंव्हा हेच लोक रंग बदलणाऱ्या सारड्याप्रमाणे वागताना दिसतात...
का होते असे?
का वागतात असे?
या प्रवृत्तीला काय म्हणायचे याचा ही समाजाने विचार करायची गरज आहे.
कारण ....
आज आपण म्हणतो प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहेत
पण ...
विविध ठिकाणी काम करत असताना काय त्रास होतो त्यांना ?
,किती समस्यांना सामोरे जावे लागते?
किती अनंत अडचणी असतात यांच्यापुढे?
पण या सर्व अडचणींवर मात करून स्त्रिया आजही वावरताना दिसत आहेत..
महिलांच्या दैनंदिन जीवनामध्ये अनंत अडचणी आहेत त्यावर भाष्य करायला गेल्यास खूप कितीतरी प्रश्नांची यादी तयार होईल
लहान पणापासूनच मुलींकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते आणि तिथेच खरा महिलाबाबत समाजाच्या मनात दुय्यम दर्जा निर्माण होतो.
नोकरी करणाऱ्या महिलांच्या समस्यां तर फार वेगळ्या आहेत.त्या धड त्यांना व्यक्त ही करता येत नाहीत.
म्हणून नुसत्या एका विशिष्ट दिवशी स्त्रियांच्या अडचणी ,समस्या,किंवा अभिनंदन ,कौतुक यावर न बोलता त्या दैनंदिन जीवनात उतरल्या पाहिजेत,आचरणात आणल्या पाहिजेत.
आजही पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज आहे.
प्रत्येक दिनी स्त्रियांचा आदर केला पाहिजे.
महिला दिनानिमित्त
सर्वांचा सम्मान करूयात,
ज्यांचा मान त्यांना देऊयात,
महिला आणखीन प्रगती कशा करतील यासाठी सर्वजण
प्रयत्न शील राहुयात,
नुसते वरवर चे महिलां विषयी न बोलता ,मोठं मोठे तत्वज्ञान न सांगता त्या कुठल्याही असो त्यांचा सम्मान करायला शिकूयात.
हेच आपले आचरण महिलांना आणखी प्रगती पथावर नेऊ शकते....
एवढाच संकल्प मनातून करूयात...
📝📝📝📝📝📝📝
ज्योती दिपक बेलवले
भिवंडी ,ठाणे.
(ATM)

No comments:
Post a Comment