विषय...गणित
घटक..जोडस्तंभालेख
उपक्रम ..माझा आलेख
जोडस्तंभालेखाचे वाचन..आकलन याचा सराव आलेखावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारुन घेतले.आलेखाचे निरीक्षण करुन काही प्रश्न मुलांनाच तयार करण्यास सांगून त्याची उत्तरे इतर मुलांकडून घेतली.
जोडस्तंभालेख कसा काढावा..प्रमाण ठरवताना आलेख कागदाचा विचार करून प्रमाण कसे ठरवावे...इ. बाबी प्रात्यक्षिकासह स्पष्ट केल्या.आलेख कागदावर दैनिक हजेरी आणून प्रत्यक्ष केवणीदिवे शाळेचा इ.५वी ते८वीचा ..मुलेमुलींचा पट फळ्यावर लिहून त्यातील माहितीवर आधारित केवणीदिवे शाळेतील मुलेमुलींचा जोडस्तंभालेख आलेख वहीत काढण्यास सांगितला .
वर्गात टाकाऊ थर्माकाँल होते.त्याचा वापर करुन मधल्या सुट्टीत मुलांकडुनच जोडस्तंभालेखाची प्रतिकृती काढून घेतली.
मुले शाळा सुटल्यावर क्रिकेट खेळतात हे मला माहित होते.त्यांना चार दिवसांच्या प्रत्येकाच्या धावा लिहून ठेवायला सांगून दोन दोन च्या जोड्या करुन रचनावादी फलकावर केलेल्या धावांच्या संख्यांचा जोडस्तंभालेख काढण्यास सांगितले .नमुना म्हणून समर गोंधळे व संदिप पाटील यांचा फोटो टाकलाय.
स्वतःच्या शाळेचा पट...स्वतःच्या धावसंख्या जोडस्तंभालेखात दाखवल्याने मुले आलेख काढताना दंग झाली.खर्या अर्थाने ज्ञानाचे उपयोजन झाल्याने मी देखील समाधानी होते.
ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे
ता.भिवंडी ..जि.ठाणे.
यांसारखे उपक्रमांसाठी पहा..
jyotideepakbelawale.blogspot.in

wow good innovation
ReplyDelete