जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 5 January 2016

चौकोन रचना..उपक्रम ..आठवी.

चौकोन रचना..
उपक्रम कृती
आठवी

पुठ्ठ्याच्या चार पट्ट्या घेतल्या.त्या एकमेकांना टाचणीच्या साह्याने जोडून चौकोन तयार केला.आता चौकोनाच्या विरुद्ध टोकांवर भार दिला असता चौकौनाचा आकार बदलतो. याप्रमाणे त्याच बाजू असणारे पण वेगळे कोन असणारे आणखी अनेक वेगवेगळे चौकोन मिळतात.

यावरुन हे लक्षात येते की..चौकोनाच्या फक्त चार बाजू दिल्या असत्या निश्चित असा एकच चौकोन मिळत नाही .

जर कर्ण काढला तर चौकोनाचा आकार बदलण्याचा प्रयत्न केला  तरी चौकोनाचा आकार बदलू शकत नाही . यावरुन चौकोन रचना करण्यासाठी विशिष्ट असे    पाच घटक देणे आवश्यक असते.
ही कृती मुलांनी स्वतः केली व त्यांच्या शब्दात अनुमान काढला.मी फक्त सुचना देवून तशी कृती करायला सांगितले .

ATM कृतिशील शिक्षक महाराष्ट्र
ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे
ता.भिवंडी ..जि.ठाणे.



No comments:

Post a Comment