जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday, 20 December 2015

मैत्री अक्षरलेखन कलेशी





मैत्री अक्षरलेखन कलेशी.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

एक चित्रकलेची मोठी वही आणली.ती रोज मधल्या सुट्टी टेबलावर ठेवत असे.डबा खाऊन झाल्यावर वर्गातील कुणीही ज्यांना  आवड नव्हे तर इच्छा असेल त्यांनी कोणत्याही प्रकारचे फक्त अक्षरलेखनच करावे अशी सुचना दिली.अक्षरलेखन कसे करावे...त्यातील बारकावे उदाहरण देऊन व चित्रांचे नमुने दाखवून स्पष्ट केले .

मुले अक्षरलेखन नमुने शोधण्यासाठी वर्तमानपत्र ..दुकानांच्या पाट्या...माझ्या मोबाईलची गँलरी...इतर पुस्तके इ. चे निरीक्षण करुन अक्षरलेखन करू लागली.आठवड्यारातच मुले  स्वतःची कल्पकता वापरुन अक्षरलेखन करु लागली.

त्यातील काही नमुने ...
आता प्रत्येक जण आवडीने अक्षर लेखन करत आहे
यामुळे लेखनाची आवड निर्माण झाली.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
ज्योती दिपक बेलवले .

No comments:

Post a Comment