जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Thursday, 3 December 2015

Playing With Cards



🌺आजचा उपक्रम 🌺

Playing With Cards

 निरुपयोगी पत्याला कागद लावून त्यावर दोन्ही बाजूने घरी इंग्रजीतील नविन (अपरिचीत)
शब्द लिहायला सांगितले .

आज ते कार्ड गोळा करुन त्यांचे सहा सहा कार्डचे भाग केले व मुलांना ते कार्ड इंग्रजी वर्णानुक्रमानुसार( alphabetical
order) लावायला सांगितले .

विद्यार्थ्यांना alphabetical order नुसार लावलेले शब्द ...शब्दकोशात dictionary त शोधायला सांगून त्याचे प्रकट वाचन व मराठी अर्थ जाणून
 घ्यायला सांगितले .

नंतर त्याच शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करायला सांगितले .

नविन शब्दासाठी इंग्रजी वर्तमानपत्रे , वरच्या इयत्तातील पुस्तकांचा वापर विद्यार्थ्यांनी केला. कृतियूक्त सहभागामुळे मुले आनंदाने सहभागी झाले.


ज्योती दिपक बेलवले.
जिप.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी .जि.ठाणे.

ATM(कृतिशील शिक्षक महारष्ट्र)

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

No comments:

Post a Comment