११/१२/२०१५.
यवतमाळ कार्यशाळेसाठी तयार केलेली कविता.
गुणवत्ता विकास.
.......................................
गुणवत्ता विकास म्हणजे काय रे बाबा?
मुलांचा सर्वांगीण विकास होय रे दादा.
मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजे काय रे बाबा?
शारीरिक ,भावनिक ,बौद्धिक ,सामाजिक ,मानसिक विकासाबरोबर चांगले वागण्याची रीत रे दादा.
गुणवत्ता विकास म्हणजे काय रे बाबा?
लिहता,वाचता येणे म्हणजेच गुणवत्ता नाय रे दादा.
गुणवत्ता विकास म्हणजे काय रे बाबा?
भारताचा सुजाण,सुदृढ नागरिक तयार करणे होय रे दादा.
गुणवत्ता काळाची गरज हाय रे दादा.
मास्तराने आता स्वतःमध्ये बदल करून घेतला पाहिजे रे बाबा.
नाहीतर....
मास्तरकी वरचा लोकांचा विश्वास उडेल रे दादा.
गुणवत्ता विकास काळाची गरज हाय रे दादा.
गुणवत्ता विकास म्हणजे ...नुसते पुस्तकी मूल्यमापन नाय रे दादा.
त्या बालकाचे सर्वांगीण मूल्यमापन हाय रे दादा.
त्या मूल्यमापनासाठी सज्ज हो रे दादा.
गुणवत्ता विकास काळाची गरज हाय रे दादा.
राज्यात या आगोदर बरीच अभियान येऊन गेली रे दादा.
पण...हे प्रगत वेगळेच हाय रे दादा.
या प्रगत मध्ये शिक्षकांना नाही शिक्षेचा बडगा.
मुलांचा गुणवत्ता विकास करणे हाच यावर तोडगा.
प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न साकार करूया रे दादा.
गुणवत्ता विकास काळाची गरज हाय रे दादा.
हेच नुसतं ध्यानात नाही तर कृतीतून दाखवून दिले पाहिजे रे दादा.
ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी ..जि.ठाणे.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
No comments:
Post a Comment