जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Thursday, 3 December 2015

उपस्थिती ध्वज

ATM (कृतिशिल शिक्षक महाराष्ट्र )

आजचा उपक्रम
👇👇👇👇👇👇👇

टाकाऊतून आकर्षक उपस्थिती ध्वज तयार करणे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गणपती उत्सवातील मुलांच्या घरी असणारे विसर्जन करणारे..  मखरातील साहित्य एकत्र करुन ठेवले . त्यातील एक चौकोनी खांब घेऊन त्याला कापून थोडा लहान केला . मखरातील हत्ती कापला.तो हत्ती खांबावर फेविकाँलच्या साह्याने चिटकवला..त्याला चारी बाजूने टाचण्या लावल्या . झाडाची सरळ काडी घेऊन ती रंगवली व हत्तीच्या मध्ये कटरने छिद्र करुन बसवली.टिंटेड कागदाचा ध्वज तयार करुन तो फेविकाँलच्या साह्याने चिटकवला..आणि ...
तयार झाला आकर्षक उपस्थिती ध्वज..ही कृती  मुलांनी स्वतः मधल्या सुट्टीत केली .उपस्थिती ध्वज तयार करताना विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर नवनिर्मितेचा आनंद दिसून येत होता.मुले फार उपक्रमशील असतात हे जाणवलं.


🌺🌺🌺🌺🌺🌺

ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी ..जि.ठाणे.

ATM( कृतिशील शिक्षक महाराष्ट्र)

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

No comments:

Post a Comment