जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday, 25 November 2015

अनोखी दिपावली.

अनोखी दिवाळी
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

 दि.५/११/२०१५ रोजी लक्ष्य फाउंडेशनशच्या सौजन्याने  शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य क्षेत्रातील ..अघई केंद्रातील आदिवासी पाड्यावरील चराचा पाडा,
 चक्कीचा पाडा,
पेंढरी आणि पारेला या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नविन ड्रेस (गणवेश नाही ), चप्पल, खेळाचे साहित्य , फराळ,फळे व
 जि.प.शाळा केवणीदिवे , ता .भिवंडी ,जि.ठाणे येथे तयार केलेले उटणे यांचे वाटप केले.
मुले खूपच आनंदी झाली कारण पहिल्यांदाच त्यांना दिवाळीसाठी नविन कपडे मिळाले होते.उटणे,चप्पल मिळाली होती.
या कार्यक्रमात चारही शाळेचे शिक्षक सहभागी झाले होते. मुलांना टँब..लँपटाँपवर शै.विडीओ दाखवले.वेगवेगळे खेळ..गाणे ..घेतली.

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

माझे कुटुंब व मित्रांनी मिळून जीवन संध्या मांगल्य संस्थान यांचे मातोश्री वृद्धाश्रम..खडावली ता.कल्याण येथे दिपावली साजरी केली.जवळजवळ १०० वृद्ध व्यक्ती तेथे आहेत.त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या ..गाणी गायलो..नाचलो देखील .
त्यांच्या सोबत आतिशबाजीच्या फटाक्यांची मजा लुटली. फराळ.फळे..वाटप केले .
विशेष म्हणजे लहान मुले देखील  यात सहभागी झाले होते.वेगळा आनंद व समाधान आजीआजोबांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता

खरच आमच्या कुटुंबाने  या लोकांबरोबर दिवाळी साजरी केली पण मनाला रुख रुख लागून गेली
ती या गोष्टीची की अशी वेळ का यावी?

का इतके बाप लेकाचे,
माय लेकराचे नाते बोथट  झाले आहे का ?
किती आशा अपेक्षा असतील त्या वृद्ध माता पित्यांच्या
काय हव असत म्हातारपणी माणसाला
दोन वेळच अन्न....

 त्याच दिवशी वेहळोली ता. शहापूर येथील मुक्तजीवन अनाथाश्रमात मिठाई व फळे वाटून दिपावली साजरी केली .

परतीच्या प्रवासात मनात अनेक प्रश्नांचे काहूर उठले होते.

यावर उपाय शोधत होते


आणि अखेर उपाय सापडला
तो उपाय म्हणजे
आपणआपल्या शाळेत असणाऱ्या मुलांना योग्य संस्कार देवुयात
कारण संस्कार हे शिक्षणातुन मिळत असतात.


चला तर मग आज असा संकल्प करुया
आपण आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सुजाण
संस्कारी सुदृढ़ नागरिक बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करुया.

शब्दांकन..
ज्योती बेलवले

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺


No comments:

Post a Comment