जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday, 21 November 2015

मूल्यशिक्षण चारोळ्या.

मूल्यशिक्षण चारोळ्या.(ATM.कृतीशिल शिक्षक महाराष्ट्र )
ज्योती दिपक बेलवले.


खालील गुण जेथे मिळती
तेथे कर माझे जुळती...
जेथे असे आदर,प्रेम ,नम्रता
तेथे दिसून येते सौजन्यशिलता.

जिथे दिसती एकतेत बंधुता
एकसंघ राहुनी बनवुया भारत भाग्यविधाता.
रुजेल तेव्हाच देशसेवेची अस्मिता
तीच खरी ठरेल राष्ट्रीय एकात्मता .

कोणतेही काम..मानू नये छोटे वा मोठे
कामावर ठेवावी निष्ठा .
मनापासून काम करुन
घडेल श्रमप्रतिष्ठा.

देश अमुचा आहे महान
सर्व भारतीयांची आन,बान,शान
देश रक्षण्या सारेच व्यक्ती
जागवतील देशभक्ती .

निट,स्वच्छ ,सुंदर कार्य
हा मंत्र प्रत्येकाने जाणा.
वस्तूंची काटकसर,पुनर्वापर
तेथेच दिसतो निटनेटकेपणा.

Time is money
म्हणून करावी वेळेची व्यवस्थापना .
करुन नियोजन वेळेचे
रुजवूया वक्तशिरपणा.

प्राणी ,वेली,अपंग ,गरजू
भावना त्यांच्या मनात शिरता.
दुःख त्यांचे आपुले वाटता.
दृष्टी पडते संवेदनशिलता.

प्रयोग,तर्क ,अनुमान यांची सांगड
असलेले विचार पसरवतील लोण.
अनिष्ट,रूढी,परंपरा मोडून
दाखवू वैज्ञानिक दृष्टिकोन .

स्त्री अथवा पुरूष
करू नका भेदभाव ..हा मंत्र जाणता.
समान हक्क,संधीने
येईल स्त्री पुरूष समानता .

सर्व धर्मांचा करुन आदर
मिटवू मनातील कटूता.
नांदू प्रेमभराने.
हवी सर्वधर्मसहिष्णुता.


( ATM..कृतीशिल शिक्षक महाराष्ट्र )
ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी .जि.ठाणे.

No comments:

Post a Comment