जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday, 21 October 2015

वाचन महिमा...कविता

📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

       वाचनमहिमा

वाचन प्रेरणा दिनी करावे वाचन,
महती वाचनाची सांगावी वर्णुन.
         वाचनाने येतो आत्मविश्वास ,
          म्हणून वाचनाचा धरावा ध्यास.
वाचन करते जीवन समृद्ध ,
मग असो कुणीही आबालवृद्ध .
        वाचनाने मिळतेय निर्मळ आनंद ,
        म्हणूनच त्याची गावे कवणे स्वानंदे.
वाचन असावे चौफेर,
उर्मी मिळून करावे लेखन स्वैर.
        वाचनाचा छंद आणे जीवनात गोडी,
        विज्ञाननिष्टा जागवून अंधश्रद्धा मोडी.
वाचनप्रिय व्यक्तीचा सहवास परिसासम,
आचार,विचारातुन ज्ञान मिळे कुबेरासम.
        वाचनाने जडतात संस्कार ,
        यास्तव त्याचा धरा आग्रह फार.
ऐवढेsss सर्व फायदे वाचनाचे,
मग ठराविक दिवशीच वाचन का करावे.
        प्रतिदिन थोडा वेळ वाचन करून ,
        विचार,मन,जीवन घ्यावे समृद्धीने भरुन.

ज्योती दिपक बेलवले .

📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

No comments:

Post a Comment