जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday, 9 October 2015

लोकसहभागातुन घेतलेला सोपा व सहज शक्य उपक्रम

🌸🌿🌺🍁🌹🌿🌸🌿🌺🍁🌹🌿🌸


जीवन शिक्षण ....गजरा बनवणे.( लोक सहभाग )

    पावसाळ्यात वेगवेगळ्या फुलांचा बहर असतो. वर्गातील मुलींना फुलांची , गजर्याची विशेष आवड असते. विकत घेतलेला गजरा महाग असतो. म्हणून कार्यानुभवच्या

तासिकेला गजरा कसा बनवावा याचे प्रात्यक्षिक दाखवून तो सर्वांकडून करुन घ्यायचा ठरविले. पण.....एक मोठी अडचण होती..

मला स्वतःलाच गजरा कसा करतात हे माहित नव्हते...सुईदोरा वापरून गजरा करता येतो मला...पण सुईदोरा न वापरता , दोरा फिरवून ..पिळीचा गजरा नव्हता येत..आणि तोच

गजरा मला शिकवायचा होता.


थोडा विचार केला..व शेजारच्या नुपूर व चित्रा ताईंची मदत घेऊन गजरा कसा करावा याचे प्रात्यक्षिक दाखवले. सर्वांनीच छान गजरे तयार केले. मुलींना खूपच आनंद झाला. गावातील महिलांचा सहभाग घेतल्यामुळे त्यांना देखील वेगळे समाधान व आनंद जाणवत होते.

आता घरच्या फुलांचाच गजरा स्वतः तयार करुन माळायचे ठरविले. ज्यांच्याकडे फुलझाडे नाहीत त्यांनी स्वतः च्या परसात फुलझाडे लावू असा निश्चय केला व दुरर्याच दिवशी झाडे

लावली देखील . जयंती, पुण्यतिथीला स्वतः तयार केलेला हार प्रतिमा पुजनास आणण्याची उत्स्फुर्त तयारी देखील दाखवली.

पहा तर...कसे गजरे केलेत मुलींनी ..ते देखील पहिल्या प्रयत्नात.


              ज्योती दिपक बेलवले .
             जि.प.शाळा केवणीदिवे .
               ता.भिवंडी , जि.ठाणे.


🌸🌿🌺🍁🌹🌿🌸🌿🌺🍁🌹🌸🌿

No comments:

Post a Comment