जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday, 11 October 2015

संकलित १ चाचणी विकसन आराखडा ...अनुभव व महत्त्वाचे मुद्दे

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)

नमस्कार 👏

दि.८ व ९ आँक्टोंबर रोजी SCERT पुणे येथे संकलित १ चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका विकसन आराखडा ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेस मला निमंत्रित केले होते
त्याचा अनुभव व महत्वाचे मुद्दे
👇👇👇👇👇👇👇👇

प्रथम नोव्हेंबर मध्ये झालेल्या पायाभूत चाचणीचे अनुभव आणि अडचणी व त्रुटी यांवर चर्चा करुन ..पुढील संकलित १ चाचणीत त्या त्रुटी पुन्हा न होण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरले.

पायाभूत चाचणी नोव्हेंबर मध्ये झाल्याने अध्यापनासाठी पुरेसा कालावधी मिळण्यासाठी संकलित १ चाचणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे ठरले.
फ़क्त (भाषा आणि गणित)

उरलेल्या चार विषयांची संकलित चाचणी १ नेहमीप्रमाणे दिवाळीच्या सुट्टी पुर्वी घेण्याचे ठरले.

भाषा व गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिका SCERT कडून मिळतील.

संकलित १ च्या प्रश्नपत्रिकेत A आणि B असे दोन विभाग असतील.

त्यापैकी A विभागात पायाभूतवर आधारित प्रश्न असतील तर B विभागात इ.१ली ते ८ वी च्या अनुषंगाने त्या इयत्तेतील प्रथम सत्रावरील घटकावर आधारित प्रश्न असतील.

संकलित १ चाचणीसाठी पायाभूतवर आधारित ४०% तर इयत्तेच्या प्रथम सत्रातील घटकावर ६०% प्रश्न विचारले जातील.

प्रश्नपत्रिकेत प्रथम सत्रातील सर्व घटकांचा सामावेश करावा.

प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे क्षेत्र ,घटक,उपघटक, प्रश्नातील तपासायचा मुद्दा, गुण इ.बाबी नमुद करावेत.

प्रश्नपत्रिका तयार करताना सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा ..शहरी , ग्रामीण इ.बाबींचा विचार करुन काढावी.

प्रश्नपत्रिकेत काही प्रश्न आव्हानात्मक असतील.

कार्यशाळेच्या पुढील बैठकीत या आराखड्यात नमुना प्रश्नपत्रिका तयार करुन त्यावर चर्चा करुन अंतिम प्रश्नपत्रिका कशी असावी हे ठरविण्यात येईल.


नंतर याच प्रश्नपत्रिका इतर भाषेत अनुवादित करण्याचे ठरले.


 ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी ..जि.ठाणे.

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)

No comments:

Post a Comment