जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday 21 March 2020

ATM ठाणे व प्राथमिक शिक्षक संघ शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने
एक दिवसीय तंत्रस्नेही कार्यशाळा संपन्न
रविवार दि. 8 मार्च 2020
स्थळ :-SVM Public School & N. J. Belawale Jr. College of Arts, Commerce & Science Asangaon.

स्वयंप्रेरणेने जे कार्य होते तेच सर्वोत्तम असते.  रविवार हा सुट्टीचा दिवस. 8 मार्च म्हणजेच जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ATM ठाणे आणि प्राथमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक प्रगल्भिकरणासाठी अध्यापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयी कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने

- तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर
- Virtual Trip
- Zoom meeting
- video making
- Google Tools चा अध्ययन अध्यापनात वापर
-सायबर च्या जगात
आदी तंत्रज्ञान विषयक विषयांवर National ICT Award Teacher and National Teacher Awardee
ATM राज्यसंयोजक विक्रम अडसूळ सर,
 ATM चे राज्यसहसंयोजक , तंत्रस्नेही शिक्षक ज्ञानदेव नवसरे (माऊली) ,
 तंत्रस्नेही शिक्षक  कोंडिभाऊ शिंदे ,
National Teacher Awardee ज्योतीताई बेलवले,
यांनी प्रात्यक्षिकाद्वारे  मार्गदर्शन केले.
आजच्या कार्यशाळेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिला अधिकारी तृप्तीताई अंधारे व साईलताताई सामलेटी यांनी महिलादिनाच्या निमित्ताने zoom meeting द्वारे शिक्षकांना संबोधित केले.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा ढोलेवस्ती या शाळेची व्हर्च्युवल ट्रिप सर्व प्रशिक्षणार्थींना घडवून आणली. यासाठी ज्ञानेश्वर विजागत यांनी मोलाचे सहकार्य केले.

या कार्यशाळेसाठी प्राथमिक शिक्षक संघाचे दीपक बेलवले सर,  प्रेरणा शेलवले,सुधाकर पाटील,गोरख गांजवे,
 प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व कार्यकर्ते  आणि  SVM Public School च्या प्राचार्या कुन्नत मॅडम व त्यांचा पूर्ण स्टाफ यांनी नियोजनाची व आयोजनाची जबाबदारी पार पाडली.
कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद मिळाला. फक्त मोबाईलचा वापर करुन अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावी कशी करावी याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.

         सौ. ज्योती दिपक बेलवले.
        जि.प.प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा
        ता- शहापूर, जि- ठाणे.









1 comment:

  1. नमस्कार
    मी संजय बिरारे, सहशिक्षक, जि. प. प्रा. शा. कोठाळवाडी के. राहिमाबाद ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथे कार्यरत आहे. शालेय कामासोबतच मी सिल्लोड प. स. मध्ये तंत्रस्नेही शिक्षक म्हणून काम पाहत आहे. फिनिक्स कॉम्पुटर, टिळक नगर, सिल्लोड या माझ्या लहान भावाच्या केंद्रातून मागील 15 वर्षांपासून जि. प. च्या शाळेंना कॉम्प्युटर संबंधित व शाळा डिजिटल करण्यासाठी मदत करत आहे.
    आपल्या शाळेतील मुलांच्या शैक्षणिक, बौद्धिक प्रगतीसाठी व कल्पकतेला वाव देण्यासाठी मी www.happyindia999.in ही वेबसाईट तयार करून जास्तीत जास्त DIY kits* (Do It Yourself) प्रकारचे शैक्षणिक साहित्य ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे या वेबसाईटवर फक्त रु9 ते रु999/- पर्यंतच दर्जेदार शैक्षणिक साहित्य कमीत कमी किमतीत उपलब्ध आहेत.
    या शैक्षणिक कामासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. वेबसाईटवर काही सुधारणा असतील तर कृपया सुचविण्यात याव्यात. आपणाकडे काही शैक्षणिक साहित्य किंवा कल्पना असतिल तर त्या आमच्या blog वर उपलब्ध करून दिल्या जातील, यासाठी आपल्या ब्लॉग ची लिंक आम्हाला नक्की पाठवा.
    सोबतच आपल्या शैक्षणिक ब्लॉगवर किंवा आपल्या whatsapp ग्रुपवर www.happyindia999.in ही लिंक share करून या शैक्षणिक कामासाठी मदत करावी ही नम्र विनंती.
    धन्यवाद
    संजय सीताराम बिरारे
    जि. प. प्रा. शा. कोठाळवाडी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद
    *चेअरमन श्री सिद्धेश्वर शिक्षक पतसंस्था, सिल्लोड*
    9834211141
    9422356008

    ReplyDelete