जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday 24 June 2018

*उपक्रम - स्वनिर्मित मोकळिका*

*विषय - गणित*
*घटक - परिमेय संख्या*

*उपघटक - संख्यारेषेवर परिमेय संख्या दाखवणे.*

https://youtu.be/DX_o92zLhzIhttps://youtu.be/DX_o92zLhzI

कार्यवाही - संख्यारेषेवर परिमेय संख्या दाखवणे हा भाग वर्गात स्पष्ट केल्यावर त्यात अधिक रंजकता कशी आणता येईल असा विचार करताना हा गणिती खेळ सुचला.

मुलांना शाळेच्या टेरेसवर नेऊन त्यांनाच एक मोठी संख्यारेषा खडूच्या साह्याने काढायला सांगितली . प्रत्येक विद्यार्थ्याला बोलावून त्यांच्या आवडीची एक परिमेय संख्या विचारली व त्याचे लेखन करण्यास सांगून उड्या मारून *संख्यारेषेवर परिमेय संख्या दाखवणे* ही मोकळिका घेतली.खेळाचा आनंद घेत मुले परिमेय संख्या अभ्यासत होती. विशेष म्हणजे मधल्या सुट्टीत मी न सांगता पॕसेजमध्ये मुले हा खेळ खेळताना पाहून खूप आनंद आणि समाधान वाटले.


सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे.
ता. भिवंडी , जि.ठाणे.

No comments:

Post a Comment