जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 4 October 2017

*ग्रेट भेट*

आज जिल्हा परिषद केवणीदिवे शाळेमध्ये *ग्रेट भेट*या सदराअंतर्गत *पाठयपुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळ सदस्य यांची मुलाखत* हे सदर घेण्यात आले.यासाठी FACEBOOK ,WHATSAPP, SKYPE यांचा वापर करून व्हिडीओ कॉल करण्यात आले होते.
या उपक्रमासाठी आज इयत्ता सातवीच्या वर्गाची निवड केली होती.
दोन दिवसांपूर्वी सर्व विषयांच्या अभ्यासमंडळ सदस्यांची वेळ घेतली होती.यासाठी विषयानुसार सदस्य असे..
👇👇
*मराठी*➖स्मिता गालफाडे(भंडारा)
*हिंदी*➖डॉ.रामदास काटे(पुणे)
*इंग्रजी* ➖शरद पांढरे(ठाणे)
*इतिहास* ➖विक्रम अडसूळ(अहमदनगर)
*भूगोल* ➖गौरीशंकर खोबरे(सोलापूर)
*विज्ञान*➖सुधीर कांबळे(उस्मानाबाद)

या सदस्यांशी शाळेतील मुलांनी यथेच्छ संवाद साधला.विविध प्रश्न विचारून पाठयपुस्तक कसे तयार होते ? स्वाध्याय निवड कशी होते? पाठयपुस्तक तयार व्हायला किती दिवस लागतात ?आपले शिक्षण किती ? आपले बालपण कसे गेले ?असे अनेक प्रश्न विचारून माहिती मिळविली.
मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता.
या उपक्रमामुळे मुलांना एक वेगळीच ऊर्जा मिळाल्याचे आणि प्रत्यक्ष पाठयपुस्तक निर्मिती करणाऱ्या सदस्यांशी बोलल्याचा वेगळाच आनंद दिसत होता.

प्रत्यक्ष  व्हिडीओ कॉल मुळे समोरासमोर बोलत असल्याचा आनंद मुलांना मिळाला.

या उपक्रमासाठी वेळ दिलेल्या सर्व मान्यवरांचे धन्यवाद.

  सौ.ज्योती दीपक बेलवले
प्राथ.शाळा केवणीदिवे
ता भिवंडी जि ठाणे.



No comments:

Post a Comment