जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday, 4 January 2017

*जिल्हा परिषद ठाणे*
            *आयोजित*
*सांस्कृतिक कार्यक्रम २०१६/१७*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

*स्थळ- गडकरी रंगायतन नाट्यगृह ठाणे*


दि.३ जानेवारी २०१७ रोजी जिल्हा परिषद ठाणे आंतर्गत कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी बालिकादिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येकातील सुप्तगुणांचा विकास व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या स्पर्धेमध्ये विविध विषय होते तसेच शिक्षकांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ठाणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेला स्तुत्य असा हा उपक्रम होता.प्रत्येक तालुक्यातून एका टीमने या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

मी आणि माझ्या सहकार्यांनी समुहनृत्यात शिक्षण विभाग भिवंडी अंतर्गत राजस्थानी *घुमर नृत्य* सादर केले.

*या समूहनृत्यातील सहभागी शिक्षक खालीलप्रमाणे*

मंजिरी विद्वांस
सविता म्हात्रे
मानसी महाकाळ
ज्योती बेलवले
रेखा बगाडे
दिपा माने
मनिषा पगारे
चंदाराणी कुसेकर
प्रशांत घागस

या नृत्याने *द्वितीय क्रमांक* पटकावला.

*प्रमुख उपस्थिती*

मा.किशोरराजे निंबाळकर साहेब - मुख्यकार्यकारी अधिकारी

मा.रविंद्र पाटील साहेब - अति.मुख्यकार्यकारी अधिकारी

मा.चंद्रकांत पवार साहेब-उपमुख्य कार्यकारी अधिकारी

मा.मिना शेंडकर मँडम- शिक्षणाधिकारी

सर्व गटशिक्षणाधिकारी

सर्व विभागांचे अधिकारी

सर्व विस्तारअधिकारी

या स्पर्धेच्या निमित्ताने खूप काही शिकता आले

No comments:

Post a Comment