आज वाचन प्रेरणा दिन जि.प.शाळा केवणीदिवे येथे उत्साहाने साजरा करण्यात आला.सकाळी ग्रंथदिंडी काढून जागृती करण्यात आली.
वाचनावर राजगुरु सर यांचे व्याख्यान झाले. शाळेतील शिक्षकांनी तसेच मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना डाँ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा जीवनप्रवास ,त्यांचे प्रेरणादायी अनुभव , विचार सांगून चेतना निर्माण केली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनगीताचे समुहगायन घेतले , स्वरचीत कवितेचे काव्यगायन केले.सकाळ मधील बालमित्राचे वाचन घेतले.
विद्यार्थ्यांनी देखील स्वरचीत काव्याचे गायन , किशोर मासिकातील कवितांचे गायन , आवडीच्या मराठी , हिंदी , इंग्रजी कवितांचे अभिनययुक्त गायन केले. विविध नाट्यछटा , संवाद ,पुस्तके यांचे प्रकटवाचन , मुकवाचन , समुहवाचन केले.नाट्यछटा आरोह अवरोह आणि आवाजातील योग्य चढउतार देऊन वाचन केले.
वाचनावर तसेच पुस्तकांवर आधारित विविध घोषवाक्यांचे वाचन केले. वाचनावर आधारित पानाफुलांच्या , दगडांच्या रांगोळ्या काढल्या. वाचनालयातील पुस्तके वाचली आणि वाचलेल्या पुस्तकातील सारांश सांगितला.' माझे आवडते पुस्तक ' या विषयावर निबंधलेखन केले.
'वाचू आनंदे' यावर उत्स्फुर्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी मांडल्या. वाचन कसे करावे , वाचनाचे साहित्य , वाचनाचे फायदे सांगून दररोज थोडा वेळ वाचन करण्याचा संकल्प केला.
शब्दांकन - सौ.ज्योती दिपक बेलवले.

No comments:
Post a Comment