🌍 बारामती येथे राज्यातील 'पहिली प्रात्यक्षिक तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा' मोठया उत्साहात संपन्न..🌎
आज दिनांक २५/१०/२०१५ रोजी बारामती येथे तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा आयोजनात पंचायत समिती बारामतीचे गटशिक्षणाधिकारी श्री. नवनाथ वनवे साहेब तसेच श्री. रामदास काटे सर व सौ. काटे मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे. कार्यशाळेविषयी थोडक्यात माहिती.....
♦शिक्षकांना विद्यार्थ्यासाठी 'टेकसेव्ही' बनवण्यासाठी आणि 'ज्ञानरचनावादात तंत्रज्ञानाचा वापर' या गोष्टीवर विशेष भर सदर कार्यशाळेत देण्यात आला.
♦सदर कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.सुरेश भारती सर, श्री. विक्रम अडसुळ सर, श्री.लक्ष्मण नरसाळे सर, श्री.गोरक्ष पावडे सर हे उपस्थित होते.
♦सदर कार्यशाळेसाठी १०५ शिक्षक उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्व लॅपटॉप सह... अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच प्रात्यक्षिकासह झालेली कार्यशाळा...
♦प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या विषयावर पीपीटी दाखवून श्री. विक्रम अडसूळ सर यांनी शंका, समाधान ,आणि मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे मूल समजून घेताना आणि दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर कितपत असावा या विषयी सखोल मार्गदर्शन त्यानी यावेळी केले.
♦ श्री. सुरेश भारती सर यानी ब्लॉग कसा बनवावा? वीडियो निर्मिती कशी करावी? ड्राइव चा वापर कसा करावा? ड्राइव मध्ये फ़ाइल अपलोड कशी करावी? फाइल शेयर कशी करावी? जीमेल मधील बारकावे? cc, bcc, compose याबाबत मार्गदर्शन केले.
♦यूटयूब चा प्रभावी कसा वापर करावा? यूटयूब वर वीडियो कसे अपलोड करावे? वीडियो कसा डाउनलोड कसा करावा? याबाबत श्री. गोरक्ष पावडे सर यानी मार्गदर्शन केले.
♦ Elearning काय आहे? elearning सुरु करण्यासाठी आवश्यक साहित्य काय आवश्यक आहे? elearning कशासाठी यावर श्री. लक्ष्मण नरसाळे सर यानी मार्गदर्शन केले.
♦MAGIC फोल्डर यात अप्रगत मूल मुक्त शाळा, दप्तरमुक्त शाळा, तसेच मूल घडविताना या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
♦ शिक्षकांना सर्व गोष्टी प्रात्यक्षिकासह शिकता आल्यामुळे त्याना नविन शिकता आले याचा आनंद चेहऱ्या वरुण ओसंडून वाहताना दिसून आला.
♦ शिक्षकांच्या तंत्रज्ञान विषयक शंका यावेळी सोडवण्यात आल्या. त्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
♦सदर कार्यशाळेला राज्याचे शिक्षण सचीव श्री.नंदकुमार साहेब यानी शिक्षकांशी संवाद साधुन मार्गदर्शन केले त्यामुळे शिक्षक प्रेरित झाल्याचे दिसून आले.
♦अशा प्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही कार्यशाळा संपन्न झाली....
धन्यवाद..!
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
शब्दांकन
उमेश कोटलवार
No comments:
Post a Comment