जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday 7 January 2023

भारतीय सैनिकाची मुलाखत

 



*मी देशाचा, देश माझा*

*भारतीय सैनिकाची मुलाखत*


आज दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी *कारगिल युद्धात सहभागी झालेले सुभेदार उमेश पिंपळे, पालघर* यांची माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली. मुलाखती दरम्यान वेगवेगळे प्रश्न विचारून, संवाद साधून माहिती घेतली. 


*उदा ...आपण आर्मी मध्ये कसे गेलात?*

*त्यासाठी किती शिक्षण लागते?*

 *त्याची निवड प्रक्रिया कशी होते?*

 *निवड झाल्यानंतर तेथे कशा प्रकारचे शिक्षण दिले जाते?*

*मुली देखील आर्मीमध्ये सहभागी होऊ शकतात का?*

*त्यासाठी त्यांनी काय करावे?*

*कारगिल युद्धातील एखादा प्रसंग किंवा आठवण सांगा.*

*आम्हा मुलांना तुम्ही कोणता संदेश द्याल?* 


अशा प्रकारच्या प्रश्नोत्तराद्वारे *विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, देशप्रेम, देशाभिमान, सैनिकांप्रती आदर* निर्माण करण्यात आला. गृहकार्य म्हणून सदर मुलाखतीचे लेखन करण्यास सांगितले.


सौ ज्योती दीपक बेलवले 

ता. शहापूर, जि. ठाणे

No comments:

Post a Comment