महिना जानेवारी, सामान्य ज्ञान, चौथा आठवडा
भौगोलिक प्रश्नावली (सामान्यज्ञान)
१)सौर कालगणनेनुसार एक वर्ष किती दिवसाचे असत ?
--- ३६५ दिवस
२)चांद्र कालगणनेनुसार एक वर्ष किती दिवसाचेअसते ?
--- ३५५
३) लीप वर्षात फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो ?
--- २९ दिवस
४) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात ?
--- दैनिक गती
५) हिंदू दिनदर्शिका कोणत्या कालगणनेवर आधारित आहे ?
--- चांद्रसौर
६) सौर कालगणनेत एक वर्ष किती महिन्यांत विभागलेले असते ?
--- १२ (बारा)
(७) इस्लाम दिनदर्शिका कोणत्या कालगणनेवर आधारित आहे ?
--- चांद्र
(८) इस्लाम दिनदर्शिकेतील महिना किती दिवसांचा असतो ?
--- २९ किंवा ३० दिवसांचा
९) भारतीय राष्ट्रीय पंचांग कोणत्या कालगणनेवर आधारित आहे ?
--- सौर कालगणना
(१०) लीप वर्ष किती दिवसाचे असते ?
--- ३६६ दिवस
गणितीय प्रश्नावली (सामान्यज्ञान)
(१) १ मिनिट म्हणजे किती सेकंद ?
उत्तर-- ६० सेकंद
(२) १ मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर -- १०० सेंटीमीटर
(३) १ लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
उत्तर-- १००० मिलिलीटर
(४) १ किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर-- १००० ग्रॅम
(५) अर्धा मिनिट म्हणजे किती सेकंद ?
उत्तर-- ३० सेकंद
(६) अर्धा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर-- ५० सेंटीमीटर
(७) अर्धा लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
उत्तर -- ५०० मिलिलीटर
(८) अर्धा किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर-- ५०० ग्रॅम
(९) एका सप्ताहात किती दिवस असतात ?
उत्तर-- ७ दिवस
(१०) पाच सप्ताह म्हणजे किती दिवस ?
उत्तर-- ३५ दिवस
(११) १ तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर -- ६० मिनिटे
(१२) १ दिवसाचे किती तास असतात ?
उत्तर -- २४ तास
No comments:
Post a Comment