जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 5 January 2022

जि प प्राथमिक शाळा दोऱ्याचापाडा तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे टॅबचे वाटप

*Learning Links Foundation दिल्ली कडून जि प प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा शाळेस 30 टॅबचे वाटप* २१ वे शतक म्हणजे तंत्रज्ञानाचे युग. आपल्या समाजातील काही घटक दुर्बल असतात. त्यांना सोबत घेऊन प्रगती करणे हा Learning Links Foundation चा उद्देश आहे. म्हणतात ना...*“Education is the most powerful weapon which you can use to change the world.”* *विशेष सहकार्य* शिक्षण विभाग जिल्हा परिषद ठाणे. मा. श्री. भास्कर रेंगडे - गटविकास अधिकारी पं. स. शहापूर. मा. श्री. भाऊसाहेब चव्हाण - गटशिक्षणाधिकारी पं. स. शहापूर. मा. सौ. डॉ.प्राजक्ता राऊत- विस्तारअधिकारी पं. स. शहापूर. सर्व टीम समग्र शिक्षा पंचायत समिती शहापूर. *प्रमुख उपस्थिती* मा. श्री. तेजेश्वर चौधरी सर - हेड ऑफ द प्रोजेक्ट मा. श्री. संदीप नांगरे सर - मॅनेजर ऑफ प्रोजेक्ट मा. श्री. अरुण मडके सर- केंद्रप्रमुख सापगाव मा.सर्व शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ दोऱ्याचापाडा. सदर कार्यक्रमास लर्निंग लिंक्स फाऊंडेशनचे रिसोर्स पर्सन म्हणून हरिचंद्र भोईर, नरेंद्र घारे ,रेश्मा तोहके, मनोहर दर्पे, अमित मोरे, राहुल गायकवाड, शब्बीर शेख, दीपाली मॅडम, आदिती मॅडम उपस्थित होत्या. जि. प. प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा ही शहापूर तालुक्यातील इयत्ता पहिली ते सातवी ची शंभर टक्के आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा. त्यामुळे येथील बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहेत. तंत्रज्ञानाचे शिक्षण या विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने शाळेसाठी 30 टॅबचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे त्यामधील कार्ड व दर महिन्याचे रिफील देखील संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. म्हणतात ना..*एकाने शिकवूया एकाला; समृद्ध करूया सर्वांना.* सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका विजय पवार मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक संजीवनी डोंगरे , प्राची तावडे , मंदा शिंदे मॅडम, जिज्ञासा बांगर मॅडम, ग्रामस्थ, जया व सुमन ताई आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. एकंदरीत सर्वांचे एकच ध्येय ते म्हणजे... Each one, teach one. सादर कार्यक्रम म्हणजे सर्वांना सकारात्मक ऊर्जा देणारा कार्यक्रम. #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव #आझादीकाअमृतमहोत्सव #आत्मनिर्भरभारत #AmritMahotsavofIndependence #जिल्हापरिषद_ठाणे #thanerural #ठाणे_ग्रामीण #जिल्हापरिषद #Thane #स्वातंत्र्याचा_अमृत_महोत्सव 🙏सर्वांना मनापासून धन्यवाद🙏 सौ. ज्योती दीपक बेलवले. जि. प. शाळा दोऱ्याचापाडा, ता - शहापूर, जि - ठाणे.

No comments:

Post a Comment