ओळख लोकसांस्कृतिक मंचाची अंतर्गत आज आपण भेटणार आहोत...एका सृजनशील व्यक्तीमत्वाला...उत्कृष्ट गायन करणाऱ्या गायिकेला...अनाथांची सेवा करणाऱ्या सेवाभावी व्यक्तिमत्वाला...प्रतिकूल संघर्षातून वाटा शोधणाऱ्या जिद्दी स्वभावाला...उपक्रमांची खाण असणाऱ्या अष्टपैलू शिक्षिकेला...अर्थातच
*सौ.ज्योती दिपक बेलवले यांना......*
थेट-केवणीदिवे ता.भिंवडी जि.ठाणेहून..
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे|
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळवंटात सुध्दा स्वस्ती पदमे रेखती|
या ओळीमधून ज्यांचे व्यक्तिमत्व क्षणाक्षणाला प्रतिबिंबीत होते असं सृजनशील व्यक्तीमत्व म्हणजेच ज्योती बेलवले.ज्योतीताईंचे जन्मगाव बोईसर ता.जि.पालघर... बालपणी घरची परिस्थिती खूपच हलाख्याची.बालपणीच वडिलांचे छत्र हरवल्याने आई मिना आणि चार भावंडांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. एका बाजूला आई परिस्थितीशी सामना करत लेकरांच्या पंखात बळ भरत होती तर दुसर्या बाजूला ज्योतीताई गावच्या जिल्हा परिषद शाळेत मैत्रिणीची पुस्तके घेऊन अभ्यास करत होती...
$ वह्या नाही,दप्तर नाही,पायाला चप्पल नाही,अभ्यासाला पुस्तक नाही होती फक्त जिद्द....आणि याच जिद्दीच्या बळावर परिस्थितीशी झगडत,स्थलांतर करत,शिक्षण घेता घेता कधी छोटसं किराणा दुकान चालवत अठरा विश्व दारिद्र्यात आणि हिमालयासारख्या आईच्या सावलीत ज्योतीताईंचे संघर्षमय बालपण गेलं..पण आईचा हा संघर्ष भविष्यात महाराष्ट्राला एक आदर्श शिक्षिका व सृजनशील व्यक्तीमत्व देऊन गेला जो आपण आज ज्योतीताईच्या रूपाने पाहतो.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
पुढे डी.एड.पूर्ण करून ठाणे जिल्ह्यातील आसनगाव ता शहापूर येथे नोकरीस प्रारंभ..दळखण नं.1 व आता केवणीदिवे या तीन शाळेत मिळून 19 वर्ष ज्योतीताईंनी उपक्रमशील शिक्षिका म्हणून काम केले. आदिवासी शिक्षणापासून वंचित समुहाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात ज्योतीताईंनी याठिकाणी उल्लेखनीय कार्य केले.त्यामध्ये⤵
$ विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन.
$ आदिवासी मुलांमध्ये शिक्षणाची जागृती घडवून आणण्यासाठी प्रचंड मेहनत.
$चराचा पाडा येथे लक्ष्य फाऊंडेशनच्या मदतीने ज्योतीताईंनी विशेष प्रयत्न करून वर्गखोली उपलब्ध केली.
$ 19वर्ष याच शाळा नावारूपाला येण्यासाठी ज्योतीताई स्वतःच उपक्रमाचे माहेरघर बनल्या.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
ज्योतीताई म्हणजेच सामाजिक बांधिलकी...आपल्या बालपणीचा संघर्ष मनात ठेवत आजही त्या सामाजिक कार्यात सहभागी होतात..त्यामध्ये⤵
$ आपला दिवाळी सण व सुट्ट्या कुटुंबासमवेत ज्योतीताई मातोश्री वृध्दाश्रम खडवली कल्याण येथे व विविध अनाथाश्रमात फळे गोड खाऊ वाटप करून साजरा करतात.
$ आपला व घरातील इतरांचा वाढदिवस ज्योतीताई झाडे लावूनच साजरा करतात.
# आदिवासी मुलांची आई बनून ज्योतीताईंनी त्यांना घडवले.
# jyotideepakbelawale.blogspot.in.......या ब्लॉगच्या माध्यमातून विविध विषयावर सुंदर लेखन.
🌷🌷🌷🌷🌷🌷
शाळेतील उल्लेखनीय कार्याबरोबरच त्यांनी राज्यस्तरावरही आपल्या उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटवलेला आहे.
त्यामध्ये...
$MSCERT.पुणे येथे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रश्नपेढी निर्मिती सदस्या..
$MSCERT पुणे येथे संकलित प्रश्नपत्रिका विकसन समिती सदस्या.
$शेगाव येथे राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक संमेलनाचे आयोजन.
$नवीन अभ्यासक्रम 2012 मधील इ.1ली ते 8वी सर्व इयत्तांच्या कवितांना चाली लावून ज्योतीताईंनी स्वतः स्वरबद्ध केल्या आहेत.
$ATM ग्रुप महाराष्ट्र ज्याची सदस्य संख्या 3000आहे या समुहाच्या सहसंयोजक म्हणून..शिर्डी येथे यशस्वी राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन.
$ठाणे येथील शिक्षक पतपेढीच्या इतिहासातील पहिल्या महिला चिटणीस म्हणून निवड तसेच 7 वर्ष संचालिका म्हणून निवड.
$19 वर्षे ठाणे जिल्ह्यातील शहापूरसारख्या आदिवासी दुर्गम भागात उल्लेखनीय शैक्षणिक कार्य.
$ अनेक तालुकास्तरीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक.
$ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातही प्रथम क्रमांक.
$आजवर विविध विषयावर 100पेक्षा जास्त कविता.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये ⤵
$ दादर-मुंबई येथील सामाजिक संस्थेच्या वतीने-सावित्रीबाई फुले -फातिमा शेख विशेष गौरव पुरस्कार 2016.
$श्री.साई प्रतिष्ठान पुणे यांचा-स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव पुरस्कार.
$जीवनदीप संस्थेच्या वतीने उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरव.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आदरणीय ज्योतीताई तुम्ही म्हणजेच संघर्षमुर्ती पण त्यापेक्षाही जास्त आज सर्वांसाठी प्रेरणादायी स्फूर्ती आहात...कितीही प्रतिकुल परिस्थितीत सृज॔नशील विचारांनी उपक्रमांचा आलेख दिवसागणिक वाढवणार्या ज्योती म्हणजे तुम्हीच...आम्हाला तुमच्यात लढणारी सावित्री-जिजाऊ-रमाई दिसते...संवेदनशील समाजमनाचा तुम्ही आदर्श आहात...अनेक आदिवासी पाड्यावरील वंचित मुलांची आई बनून त्यांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत तुम्ही प्रज्वलीत केली...तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे अष्टपैलू...गायन,लेखन,वाचन,अभिनय हे तुमचे आवडते छंद...ए.टी.एम या शैक्षणिक समुहातून शैक्षणिक क्रांतीसाठी धडपडणार्यां अनेक व्यक्तीमत्वापैकी तुम्ही एक आहात...तुमचे पती दिपकजी आणि आई मिना हेच तुमचे खरे प्रेरणास्थान...नवनिर्मितीचा...सृजनशीलतेचा...उत्कृष्टतेचा...तुम्ही मानबिंदुच...अनाथांच्या झोपडीत तुम्ही दिवाळी साजरी करता ही आपल्या मनाची किती संवेदनशीलता...ज्योतीताई आपला प्रवास खरचं खूप प्रेरणा देणारा आहे...संघर्षातूनच जगात सर्वोत्कृष्ट घडते याचे उदा.आपणचं...तुमच्या धगधगत्या जिगरबाज संघर्षाला..जिद्दीला...कर्तृत्वाला...नवनिर्मितीला..लोकसांस्कृतिक मंच औरंगाबादचा सलाम....व मनपुर्वक शुभेच्छा....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भरत काळे (लोकसांस्कृतिक मंच औरंगाबाद)
9420656649

Absolutely Hats Off Mam!!!!
ReplyDeleteGreat Efforts!!!!
Fortunate to be one of your follower