जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday, 30 October 2015

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)


"जीवन कौशल्य "    
                                                                                                                                             काल  जि प प्राथ शाळा केवणीदिवे शाळेत कार्यानुभव  विषया अंतर्गत उत्पादक उपक्रमातील "अन्न एक उपक्रम" या अंतर्गत  प्रात्यक्षिक घ्यायचे  होते, काय घ्यावं? कोणता उपक्रम घ्यावा या विचारात असतानाच मुलींबरोबर चर्चा चालू होती.  माझ्याकडे इयत्ता आठवीचा वर्ग असल्यामुळे मी वेगळ्या पदार्थाच्या विचारात होते .नक्की कोणता उपक्रम  घ्यावा ? अखेर शाळेतील मुलींनी माझ्यापुढील संकट दूर केले आणि आमचा उपक्रम ठरला. ....... उपक्रम  होता प्रत्यक्ष  कृती युक्त उपक्रम ...आणि  मुलींनी उपक्रम सुचवला होता.

 "वेज मंचुरियन "

 सुरवातीला मी देखील  गोंधळून गेले कारण मी चायनीज  डीश बनवणे हा उपक्रम कधी शाळेत घेतला नव्हता . फक्त इंडीयन डिशच घेतल्या होत्या . पण म्हणतात न मुलं फार उपक्रमशील असतात .आणि अखेर कृती साठी आवश्यक असणारे साहित्य गोळा केले .हा उपक्रम जरा अवघड वाटत होता कारण प्रत्यक्ष  स्वयंपाकाची कृती करायची होती .  मुलींनी  सुंदर पाककृती करत "वेज मंचुरियन" बनविले त्यांनी त्यांची कृती फार सुदर रीत्या पार पाडली  .

पण एक अनुभव येवून गेला....... की मुले फार उपक्रमशील असतात .आणि शालेय अभ्यासक्रमामध्ये अश्या जीवन कौशल्यावर आधारित घटकांचा समावेश असला पाहिजे.शेवटी शाळेतील सर्व मुलांनी आपण स्वतः केलेल्या पाककृतीचा मनमुराद आनंद लुटला....

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

ज्योती दिपक बेलवले
जि प शाळा केवणीदिवे,ठाणे
💐💐💐💐💐💐💐

कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)

No comments:

Post a Comment