जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday, 5 January 2022

संविधान दिन रांगोळी

*सबसे प्यारा, संविधान हमारा !!* #Constitutionday2021, #Constitutionweek2021, #MyConstitutionMyPride #आजादीकाअमृतमहोत्सव असंख्य भाषा, जाती, पंथ, धर्म असणाऱ्या वैविध्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे असे भारतीय संविधान आहे. दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देणारे भारतीय संविधान दिन 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला अर्पण करण्यात आले. संविधानातील मुलतत्त्वांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी, संविधानाचा परिचय होऊन सुजाण आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्यांविषयी जाणीव जागृती होणे या उद्देशाने संविधान दिनानिमित्त *जि. प. शाळा दोऱ्याचापाडा येथे माझे संविधान माझा अभिमान* या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 3 री ते 4 थी च्या विद्यार्थांनी रांगोळी काढणे या उपक्रमात सहभाग घेतला. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पवार, संजीवनी डोंगरे, प्राची तावडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. सौ. ज्योती दिपक बेलवले. जि. प. शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र- सापगाव, तालुका- शहापूर, जिल्हा- ठाणे.

No comments:

Post a Comment