जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday, 5 January 2022

शहापूर, चाराचापाडा येथील आदिवासी वस्तीत शालोपयोगी साहित्य कपडे व खाऊ वाटप

*गायत्री आनंद दात्री फाऊंडेशन मुंबई* आज *रविवार दि.* *१२/१२/२०२१* रोजी *जिल्हा परिषद शाळा चराचापाडा* येथे तानसा अभयारण्य, तानसा तलाव व निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गावात एक सुंदर कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाला जि.प.शाळा चराचापाडा शाळेतील सर्व शिक्षक , विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी छान असे ईशस्तवन गाऊन सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर स्वागतगीत गाऊन आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.. जि. प. शाळा दोऱ्याचापाडा शाळेतील तसेच *राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त* सौ. ज्योती बेलवले मॅडम यांच्या माध्यमातून गायत्री आनंद दात्री फाऊंडेशन ने चराचापाडा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे तसेच खाऊ आणि गावातील महिलांसाठी प्रत्येकी २ साड्या याप्रकारे व पुरुषांना पँट- शर्ट यांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला गायत्री आनंद दात्री फाऊंडेशन चे सदस्य पल्लवी मॅडम, शिल्पा मॅडम, स्नेहल मॅडम तसेच निशा मॅडम आदी उपस्थित होत्या.. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . कोळेकर मॅडम यांनी सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर पल्लवी मॅडम आणि बेलवले मॅडम यांनी गावातील महिलांना आणि ग्रामस्थांना स्वच्छता व शिक्षणासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले. चराचा पाडा येथील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, तर ग्रामस्थ सुद्धा उपस्थित होते. शेवटी सर्वानी सुग्रास अश्या जेवणाचा स्वाद घेतला व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 🙏🏻धन्यवाद🙏🏻

No comments:

Post a Comment