जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday, 21 July 2023

शहापूर तालुक्यातील गावातील लपलेले शब्द शोधणे.




स्थानिक परिस्थितीवरील उपक्रम

*शहापूर तालुक्यातील गावांच्या नावात लपलेले शब्द शोधणे.*

FLN - विकासात्मक ध्येय क्रमांक २

अध्ययन निष्पत्ती

ECL१- ६.७ ब: स्वतःच्या आवडत्या कृती सांगते, स्पष्ट करते, लपलेले शब्द शोधते आणि वहीत, फलकावर  लिहिते.

विषय - मराठी 

घटक - डॉ. कलाम यांचे बालपण

उपघटक - खेळूया शब्दांशी

*शहापूर तालुक्यातील गावांच्या नावात लपलेले शब्द शोधणे.*


खेळूया शब्दांशी या उपक्रमांतर्गत मुलांना शहापूर तालुक्यातील  त्यांच्या आवडीच्या गावांची निवड करण्यास सांगितले. त्या गावांच्या नावात लपलेले शब्द शोधण्यासाठी सांगितले...

विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेऊन  उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला. त्यातील काही निवडक प्रतिसाद.


सौ. ज्योती दीपक बेलवले. 

ता. शहापूर, जि. ठाणे.

Saturday, 7 January 2023

Kids App By Jyoti Belawale

 






*अंगणवाडी व पहिली दुसरीच्या मुलांसाठी उपयुक्त ऍप आता प्ले स्टोअर वर..*

*Kids App By Jyoti Belawale*

NEP 2020 चा विचार करून अंगणवाडी ते दुसरी या आकृतीबंधाला अनुसरून 5 ते 8 वयाच्या सर्व मुलांचे शिकणे सोपे होणेसाठी हे ऍप बनवले आहे.

*या ऍप मध्ये काय आहे*

संख्याज्ञान (वाचन व लेखन), इंग्रजी मुळाक्षरे (वाचन व लेखन), इंग्रजी महिने, आठवड्याचे वार, प्राणी, फळे या घटकांचा समावेश आहे. या ॲप द्वारे आनंददायी पद्धतीने प्रत्येक मूल शिकेल याचा मला विश्वास आहे.

देशभरातील प्रत्येक अंगणवाडी व इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी हे offline ऍप फायदेशीर  ठरणार आहे.  हे ऍप महाराष्ट्रातील ऍपगुरू अमोल हंकारे(सांगली)  यांच्या मार्गदर्शनाखाली बनवले आहे.

*ऍप लिंक*

https://play.google.com/store/apps/details?id=com.app.jyoti

सौ.ज्योती दीपक बेलवले

    (ठाणे,महाराष्ट्र)